आयपीएलमधील एका सामन्याची कमाई सर्वात भारी

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

लंडन - क्रिकेट विश्‍वाला भूरळ पाडणाऱ्या आणि मालामाल करणाऱ्या आयपीएलने आता जगात सर्वात श्रीमंत लीग असा लौकिक मिळवला आहे. आयपीएलमधील प्रमुख खेळाडूंची एका सामन्यातील कमाई जगात इतरत्र खेळल्या जाणाऱ्या कोणत्याही लीगपेक्षा सर्वाधिक असल्याचे ‘गार्डियन’च्या सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे. 

सध्या लंडनमध्ये असलेले बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष ललित मोदी यांच्या संकल्पनेतून जन्मलेल्या आयपीएलचे मॉडेल सर्वत्र वापरले जात आहे. युरोपात आणि प्रामुख्याने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धा याच धर्तीवर अगोदरपासून खेळली जात आहे. 

इंग्लिश प्रीमियर लीग ही जगातील सर्वात श्रीमंत लीग म्हणून ओळखली जाते; परंतु या लीगमधील सर्वात अव्वल खेळाडू सरासरी सुमारे २९ लाख ९० हजार युरो वर्षाला कमावतात; परंतु आयपीएलमधील अव्वल खेळाडूंची एका सामन्यातील कमाई दोन लाख ७४ हजार ६२४ युरो इतकी भरगच्च आहे. आयपीएलचे खेळाडू १४ साखळी सामने खेळतात. आयपीएलनंतर सर्वाधिक कमाई एनएफएल (अमेरिकन फुटबॉल लीग) १ लाख ३८ हजार ३५४ युरो आहे. प्रीमियर लीगमधील खेळाडूंची हीच कमाई सामन्यामागे ७८ हजार ७०३ युरो होते. प्रीमियर लीगमधील खेळाडू वर्षाला जास्तीत जास्त ३८ सामने खेळतात. त्याबरोबरच ते एफए कप, युरोपा कप आणि चॅम्पियन्स लीगसारख्या लीगमध्ये खेळत असतात. या सर्व सामन्यांचा विचार करता ईपीएलमधील खेळाडू आयपीएलपेक्षा वर्षभरात जास्त कमाई करतात; मात्र एका सामन्याचा विचार करता आयपीएल खेळाडूंची कमाई सर्वाधिक आहे.

आयपीएलने १९ टक्के वृद्धी केली. २०१७ मध्ये ५.२ अब्ज डॉलरची उलाढाल झाली होती. या वेळी ती ६.३ अब्ज झाली होती.

मुंबई इंडियन्सची सर्वाधिक ब्रॅंड व्हॅल्यू 
डफ आणि फेप्स कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार उद्योगपती मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या मुंबई इंडियन्सची ब्रॅंड व्हॅल्यू ११ कोटी ३० लाख डॉलर इतकी सर्वाधिक आहे. त्यानंतर शाहरुख खानची मालकी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा (१० कोटी ४० लाख डॉलर) क्रमांक लागतो.

Web Title: IPL cricketers earn more money per match