मोदी स्टेडियम मध्ये मोदी ? IPL फायनलसाठी गुजरात टायटन्सला करणार सपोर्ट ?
esakal

मोदी स्टेडियम मध्ये मोदी ? IPL फायनलसाठी गुजरात टायटन्सला करणार सपोर्ट ?

आयपीएलमधील नवखा संघ गुजरात टायटन्स आपल्या पहिल्याच हंगामात आयपीएलची फायनल खेळणार आहे.

आयपीएलमधील नवखा संघ गुजरात टायटन्स आपल्या पहिल्याच हंगामात आयपीएलची फायनल खेळणार आहे. रविवारी (29 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरूद्ध तो भिडणार आहे. गुजरात आपल्या होम ग्राऊंडवर तब्बल 1 लाख 30 प्रेक्षकांच्या समोर आपली पहिली वहिली आयपीएल फायनल खेळेल. विशेष म्हणजे ही फायनल मॅच पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह मैदानात हजेरी लावणार आहेत.

मोदी स्टेडियम मध्ये मोदी ? IPL फायनलसाठी गुजरात टायटन्सला करणार सपोर्ट ?
IPL मधून बाहेर पडताच विराट कोहलीचा चाहत्यांसाठी भावुक मेसेज

हा फायनल सामना खेळवण्यापूर्वी सांगता सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे यंदाचा आयपीएलचा सांगता समारंभ हा भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत त्यावर आधारलेला असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मैदानामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

तसेच, या कार्यक्रमात अभिनेता रणवीर सिंह, ए.आर. रेहमान, उर्वशी रौतेला देखील परफॉर्म करण्याची शक्यता आहे. आमिर खान देखील आपल्या नव्या लालसिंग चढ्ढा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करणार आहे.

मोदी स्टेडियम मध्ये मोदी ? IPL फायनलसाठी गुजरात टायटन्सला करणार सपोर्ट ?
IPL 2022 Final : तीन वर्षानंतर 'सांगता' समारंभ, खास तर असणारच भाऊ

पंतप्रधान नरेंद्र मोदी फायनल स्पर्धेपूर्वी गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. तर गृहमंत्री शाह गुजरात दौऱ्यावरच आहेत. अशातच हे दोघे आयपीएल फायनलला हजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार , शुक्रवार ते रविवार अहमदाबादमध्ये राजकीय आणि क्रीडा कार्यक्रम आहेत. अशा स्थितीत 6,000 हून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने राज्य राखीव पोलीस (एसआरपी), जलद कृती दल (आरएएफ) आणि इतर एजन्सींनाही सुरक्षा व्यवस्थेसाठी सामील केले आहे.

गुरुवारी पोलिसांच्या अनेक पथकांनी अहमदाबादमधील संवेदनशील भागात फ्लॅग मार्च काढला. अहमदाबादचे पोलीस आयुक्त संजय श्रीवास्तव यांनी, सांगितल्या प्रमाणे, येत्या काही दिवसांत १७ डीसीपी, ४ डीआयजी, २८ एसीपी, ५१ पोलीस निरीक्षक, २६८ उपनिरीक्षक, ५,००० हून अधिक कॉन्स्टेबल, १,००० होमगार्ड आणि एसआरपीच्या तीन कंपन्या सुरक्षेचा भाग असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com