
T20 Cricket : देशासाठी नको, फक्त टी-२० लीग खेळा; 'या' खेळाडूंना IPL फ्रेंचाइजींची ५० कोटींची ऑफर
सध्या आयपीएलचा थरार हा शिगेल पोहचला आहे. यादरम्यान आयपीएलच्या अव्वल संघांच्या मालकांनी सहा इंग्लिश खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून एक वर्षासाठी T20 लीग खेळण्यासाठी 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 'टाइम्स लंडन'च्या रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे.
वृत्तानुसार, अनेक फ्रँचायझी खेळाडूंना वर्षभराच्या करारावर साईन करण्याचा प्रयत्न करत आहेत. या करारानुसार खेळाडूंना वर्षभर वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये खेळावे लागणार आहे. आयपीएल व्यतिरिक्त, यात वेस्ट इंडिजची सीपीएल, दक्षिण आफ्रिका टी20 लीग, यूएईची ग्लोबल टी20 लीग आणि अमेरिकेत होणारी टी20 लीग यांचा देखील समावेश आहे. या सर्व लीगमध्ये IPL च्या 10 फ्रँचायझींपैकी अनेक संघ सहभागी होतात.
या रिपोर्टनुसार, जर एखाद्या खेळाडून हा करार स्विकारला तर त्या खेळाडूला अंतरराष्ट्रीय क्रिकेटपेश्रा जास्त महत्व हे आयपीएल फ्रँचायझीला द्यावे लागणार आहे. या खेळाडूला त्याच्या देशाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी फ्रेंचायझीकडून परवानगी घ्यावी लागेल. सध्या फुटबॉलमध्ये हेच होत आहे. क्रिकेटमध्ये, प्रत्येक देशाचे खेळाडू त्यांच्या देशाच्या क्रिकेट बोर्डानुसार खेळतात आणि T20 लीगमध्ये सहभागी होण्यासाठी बोर्डाची परवानगी घेतात.
T20 क्रिकेटची लोकप्रियता वाढतेय...
सध्या जगभरात T20 क्रिकेटची लोकप्रियता खूप जास्त आहे आणि T10 मधील प्रेक्षकांची आवडही वाढत आहे. एका वर्षात एक खेळाडू किती टी-20 लीगमध्ये भाग घेऊ शकतो याचा नियम आयसीसी तयार करण्याचा विचार करत आहे, परंतु सध्या असा कोणताही नियम नाही. यामुळे अनेक युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अकाली निवृत्ती घेऊन पैसे कमावण्यासाठी टी-20 लीग खेळण्याची शक्यता आहे. सध्या न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि गप्टिल सारख्या खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेट बोर्डाचे करार T20 लीगमध्ये खेळण्यासाठी सोडले आहेत.
हेही वाचा - Types of Vedas: वेदांचे प्रकार
पैसा पाचपट मिळणार..
या प्रकरणी अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी संपर्क साधण्यात आल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. आता या प्रकरणी इंग्लंडच्या खेळाडूंशी देखील चर्चा झाली आहे. एका वर्षाच्या करारासाठी खेळाडूंना 20-50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे, जी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून करार मिळवणाऱ्या अव्वल खेळाडूंपेक्षा पाचपट जास्त आहे.
खेळाडू काय म्हणतायत…
इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळणारे खेळाडू सध्या कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीकडून ऑफर स्वीकारण्यास तयार नाहीयेत, परंतु या खेळाडूंना मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत खेळाडू ही ऑफर स्वीकारण्याची शक्यता आहे.
याशिवाय, खेळाडू त्यांच्या देशाच्या क्रिकेट बोर्ड आणि आयपीएल फ्रँचायझीशी आंशिक करार करू शकतात. या स्थितीत खेळाडू टी-20 लीगसाठी ठराविक वेळेत आणि उर्वरित वेळेत देशासाठी खेळतील. विशेषत: टी-20 क्रिकेट खेळणारे खेळाडू असे करार स्वीकारण्याची शक्यता जास्त असते.