IPL : मुंबई इंडियन्सचा गुजरातवर विजय

सूर्यकुमारच्या झंझावाती शतकानंतर गोलंदाजांनीही केली कमाल
ipl
iplsakal

मुंबई - काही सामन्यांपूर्वी अडखळत असलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएल अंतिम टप्यात आली असताना जोर पकडला. गतविजेत्या गुजरातचा २७ धावांनी पराभव करत तिसरे स्थान मिळवले आणि प्ले ऑफसाठी दावेदारी प्रबळ केली. सूर्यकुमारचे झंझावाती शतक आकाश मधवाल आणि पियुष चावलाची कमाल करणारी गोलंदाजी मंबईच्या या विजयाचे वैशिष्ठ ठरली.

मुंबईत प्रचंड उकाडा लाही लाही करत असताना सूर्यकुमारची बॅट आग ओकत होती. अवघ्या ४९ चेंडूत त्याने नाबाद १०३ धावांची अविस्मरणीय खेळी साकारली. त्यामुळे मुंबईने ५ बाद २१८ अशी भक्कम धावसंख्या उभारली. सूर्यकुमारच्या या खेळीला गोलंदाजांनी चार चाँद लावले. पहिल्या षटकापासून गुजरातचा एकेक मोहरा बाद करण्यास सुरवात केली.

ipl
Pune : कात्रज - कोंढवा रस्त्यावर अपघातात पती-पत्नी जागीच ठार

सुरवातीला मधवान आणि बेरेडाँफ यांचा प्रभाव इतका होता की गतविजेत्यांनी निम्मा संघ ५५ धावांत गमावला होता. आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवणाऱ्या चावलाने धोकादायक तेवटियाचीही विकेट काढली. तर दुसऱ्या हप्त्यात मधवालने मिलरचा अडसर दूर केला. मुंबईला मोठा विजय मिळवण्याची संधी होती, परंतु राशीद खानने ७९ धावांची खेळी करून गुजरातच्या पराभवाचे अंतर कमी केले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी मिळालेल्या मुंबईला कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी दहा धावांच्या सरासरीने ६१ धावांची सलामी दिली. मुंबईची अवस्था ३ बाद ८८ अशी झाली.

सूर्यकुमार यादव एका बाजूने डाव सावरत होता आणि वेगही कायम ठेऊन होता. प्रथमच खेळण्याची संधी मिळालेल्या विष्णू विनोदने आपली निवड सार्थ ठरवताना २० चेंडूत ३० धावा फटकावल्या. पण एव्हाना सूर्या तळपायला लागला होता. मुंबईचा संघ द्विशतकी मजल मारणार हे निश्चित होते, पण अखेरच्या दोन षटकांत सूर्याची बॅट आग ओकायला लागली आणि मुंबईने उभाललेल्या २१८ धावा या गुजरातविरुद्ध सर्वाधिक ठरल्या.

ipl
G20 India Mumbai : जी २० ऊर्जा संक्रमण कार्यगट; तिसरी बैठक सोमवारपासून मुंबईत

संक्षिप्त धावफलक

मुंबई ः २० षटकांत ५ बाद २१८ ( सूर्यकुमार यादव नाबाद १०३ - ४९ चेंडू, ११ चौकार, ६ षटकार) विजयी वि. गुजरात २० षटकांत ८ बाद १९१ (राशीद खान नाबाद ७९, आकाश मधवाल ४-०-३१-३).

सूर्यकुमारचा तडाखा

१६ व्या षटकापर्यंत ३१ चेंडूत ४७

२० व्या षटकाअखेर ४९ चेंडूत नाबाद १०३

सूर्याचे पहिले आयपीएल शतक

अखेरच्या चेंडूवर षटकार मारुन झळकावले शतक

गुजरातविरुद्ध कोणत्याही फलंदाजाकडून पहिली शतकी खेळी

गुजरातविरुद्ध प्रथमच २१८ ही मोठी धावसंख्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com