माफक आव्हानाचा बचाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

हैदराबादची अनोखी हॅट्‌ट्रिक, राजस्थान रॉयल्सवर 11 धावांनी विजय
जयपूर - माफक आव्हानाचा बचाव करण्याची आता सनरायझर्स हैदराबाद संघाला जणू सवय झाली असावी. आयपीएलमध्ये रविवारी आणखी एका ‘लो-स्कोरिंग’ सामन्यात त्यांनी गोलंदाजांच्या भरीव कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर ११ धावांनी विजय मिळविला.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाला २० षटकांत ७ बाद १५१ धावांत रोखण्यात राजस्थानला यश आले होते. मात्र, टी-२० मध्ये सहज शक्‍य असलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना या वेळीही त्यांच्या नाकीनऊ आले. त्यांचा डाव ६ बाद १४० असा मर्यादित राहिला.

आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला चांगली सुरवात देण्यात राहुल त्रिपाठी पुन्हा अपयशी ठरला. त्यानंतर फॉर्मात असणारा संजू सॅमसन आणि कर्णधार अजिंक्‍य रहाणे ही जोडी जमली. त्यांनी सातची धावगती राखली होती. मात्र, सिद्धार्थ कौलला उशिरा चेंडू सोपविण्याचा हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनचे नियोजन जबरदस्त ठरले. त्याने ही जमलेली जोडी फोडताना सॅमसनला बाद केले. 

राजस्थानची त्या वेळी ९.७ षटकांत २ बाद ७२ अशी स्थिती होती. अशा सुरक्षित स्थितीतूनही त्यांच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. युसूफ पठाणने केवल दोन षटके गोलंदाजी करताना स्टोक्‍सला भोपळा फोडण्यापूर्वी बाद केले. रशिदने बटलरचा अडथळा दूर केला. प्रमुख गोलंदाज भुवनेश्‍वरच्या गैरहजेरीतही संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल आणि बसिल थंम्पी या वेगवान गोलंदाजांनी कमालीचा अचूक मारा करून संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. 

त्यापूर्वी, धवन लवकर बाद झाल्यानंतरही ॲलेक्‍स हेल्स (४५) आणि केन विल्यम्सन (६३) यांच्या ९२ धावांच्या भागीदारीमुळे हैदराबादचे आव्हान उभे राहू शकले. हैदराबादचे अन्य फलंदाज फटकेबाजी करण्यात अपयशी ठरले.

संक्षिप्त धावफलक 
हैदराबाद २० षटकांत ७ बाद १५१ (केन विल्यम्सन ६३ -४३ चेंडू, ७ चौकार, २ षटकार, ॲलेक्‍स हेल्स ४५ -३९ चेंडू, ४ चौकार, जोफ्रा आर्चर ३-२६, के. गौतम २-१८) वि.वि. राजस्थान २० षटकांत ६ बाद १४० (अजिंक्‍य रहाणे नाबाद ६५ -५३ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, संजू सॅमसन ४०, सिद्धार्थ कौल २-२३, संदीप शर्मा १-१५, बसिल थंम्पी १-२६, रशिद खान १-३१, युसूफ पठाण १-१४)

आधीच्या दोन सामन्यांत
हैदराबाद ६/१३२ (२०) 
वि. पंजाब ११९ (१९.२)
हैदराबाद ११८ (१८.४) 
वि. मुंबई ८७ (१८.५)

Web Title: IPL Premier League cricket