भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल करणार 'या' प्रायोजकाचा फेरविचार; वाचा सविस्तर...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

चीनमधील कंपनी तसेच उत्पादकांवर पूर्णपणे बंदीचा निर्णय सरकारने घेतल्यास विवोचा आयपीएल पुरस्कार रद्द करण्याबाबत फेरविचार करण्यास तयार असल्याचे भारतीय मंडळाचे पदाधिकारी सांगत आहेत.

नवी दिल्ली / मुंबई ः चीनमधील कंपन्यांना होत असलेल्या वाढत्या विरोधामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ विवोच्या आयपीएलसह असलेल्या पुरस्काराबाबत फेरविचार करण्याचा पर्याय तपासून बघत असल्याचे संकेत मिळत आहेत. 

यंदाच्या आषाढी एकादशीला 'प्रति पंढरपूर'चे होणार दर्शन ऑनलाईन... 

चीनमधील कंपनी तसेच उत्पादकांवर पूर्णपणे बंदीचा निर्णय सरकारने घेतल्यास विवोचा आयपीएल पुरस्कार रद्द करण्याबाबत फेरविचार करण्यास तयार असल्याचे भारतीय मंडळाचे पदाधिकारी सांगत आहेत. मात्र कोरोनाच्या आक्रमणामुळे चीनविरुद्धचा रोष वाढत आहे. आता त्यात चीनविरुद्धच्या संघर्षामुळे जास्तच भर पडली आहे. या परिस्थितीत कोरोनाच्या कालावधीत चीनमधील कंपन्यांचा पुरस्कार असलेली आयपीएल संयोजित करणे अवघडही होऊ शकेल, असे मानले जात आहे.
 
दुष्काळात तेरावा महिना ! ऐन लॉकडाऊनमध्ये डिझेल दरवाढीने एसटीचे चाक आणखी खोलात...

भारतीय क्रिकेट मंडळाच्या निर्णयावर केंद्रात सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्षाचा चांगलाच वरचष्मा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह हे भारतीय मंडळाचे सचिव आहेत, तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण धुमळ हे मंडळाचे खजिनदार आहेत. यामुळे भारतीय मंडळास सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घेणे भाग पडणार आहे. विवो आयपीएलचे पुरस्कर्ते आहेत, त्यात बदल झालेला नाही, असे धुमळ यांनी सांगितले; पण लगेचच देशाचे हित आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे, ही पुष्टी जोडल, याकडे विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. 

बिग बॉस 11 मधील 'हा' स्पर्धक नैराश्यामध्ये; वाचा सविस्तर...
 

भारतातील काही सेलिब्रिटी परदेशी उत्पादकांवर बंदीची मागणी करतात, त्यातून चीन कधीच पुढे गेला आहे. भारतात ही मागणी सुरू करणारा एक आघाडीचा खेळाडू आहे. आता तोच भारताच्या उच्च संस्कृतीची नकारात्मक प्रतिमा निर्माण करीत आहे. 
- हु झिजिन, ग्लोबल टाइम्सचे संपादक 
(ग्लोबल टाइम्स हे चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र आहे.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ipl thinking on cancling the sponsorship amid india china faceoff