
WPL 2023 : 'कॅमेरेवाले IPL मध्ये सुंदर तरुणी दाखवल्या आता WPL मध्ये...' त्या पोस्टरनं वेधलं लक्ष
IPL Vs WPL 2023 Social media viral memes : भारतीय क्रीडाविश्वामध्ये आयपीएलची लोकप्रियता मोठी आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरु झालेल्या आय़पीएलनं बघता बघता मनोरंजनाचे सगळे विक्रम मोडीत काढले आहे. प्रत्येक वर्षी होणाऱ्या आयपीएलचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
सध्या सोशल मीडियावर आयपीएलची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. या सगळ्यात नव्यानं सुरु होणाऱ्या डब्ल्यु पी एलची देखील चर्चा होताना दिसते आहे. यावेळी एका पोस्टर्सनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.त्यामध्ये आय़पीएलच्या चाहत्यानं कॅमेऱामॅनकडे जी मागणी केली आहे त्याची चर्चा होताना दिसते आहे.
महिला प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेला आता सुरुवात झाली असून मुंबई इंडियन्सने मैदान गाजवले आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई संघाचा सामना गुजरात जायंट्सशी झाला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाने तब्बल १४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. दरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये राष्ट्रगीतादरम्यान परदेशी खेळडूकडून मोठी चूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान आयपीएल विरुद्ध डब्ल्युपीएल याविषयी भन्नाट मीम्स व्हायरल होताना दिसत आहे. एका नेटकऱ्यानं यापूर्वी आयपीएलमध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सुंदर तरुणींना कॅमेराबद्ध केले जायचे. यासगळ्यात आता महिला प्रीमिअर लीग मध्ये आम्हाला कुणाचे फोटो दाखवणार, मुलांचे फोटोकडे कॅमेरामन कॅमेरा नेणार का, असा प्रश्नही यावेळी नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.