Arjun Tendulkar IPL 2023: अर्जुन तेंडुलकरला चावला कुत्रा, LSG vs MI सामन्यापूर्वी घडली घटना, पहा VIDEO | Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MI vs GT Playing 11 Arjun Tendulkar

Arjun Tendulkar IPL 2023: अर्जुन तेंडुलकरला चावला कुत्रा, LSG vs MI सामन्यापूर्वी घडली घटना, पहा VIDEO

Arjun Tendulkar IPL 2023 : लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळला जाणारा सामना एलएसजी आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण येथील पराभूत संघासाठी प्लेऑफच्या शर्यतीत अडचणी निर्माण होणार आहेत.

आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यापूर्वी एक मोठी घटना घडली. अर्जुन तेंडुलकरला कुत्रा चावला आहे. लखनऊच्या एकना स्टेडियममध्ये एलएसजीच्या खेळाडूंना भेटत असताना अर्जुननेच या घटनेचा खुलासा केला. डावखुरा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सचा भाग आहे.

लखनऊ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अर्जुन तेंडुलकर दोन एलएसजी खेळाडू युद्धवीर सिंग चरक आणि मोहसिन खानला भेटताना दिसत आहे. या भेटीत तो त्या दोघांना सांगत आहे की, त्याला कुत्रा चावला आहे.

आता प्रश्न असा आहे की त्यांच्यावर कुत्र्याने कधी हल्ला केला? त्याने असे सांगितले की, एक दिवसापूर्वी अर्जुन तेंडुलकरची प्रकृती जाणून घेतल्यानंतर युधवीर सिंग आणि मोहसिन खान या दोघांनीही त्याला स्वतःची काळजी घेण्यास सांगितले. व्हिडीओ पाहिल्यावर कुत्र्याने अर्जुनच्या डाव्या हाताला चावा घेतल्याचे समजते. दुखापतीच्या खुणा त्याच्या बोटांजवळच आहेत. त्यामुळे तो नेटवर गोलंदाजी करताना दिसणार नाही.

मात्र, अर्जुन तेंडुलकर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळणार की नाही, हे माहीत नाही. त्याच मोसमात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. पदार्पणानंतर त्याने सलग 4 सामने खेळले आणि त्यानंतर तो संघातून बाहेर पडला. अर्जुन तेंडुलकरने आयपीएल 2023 मध्ये खेळलेल्या 4 सामन्यांमध्ये 3 विकेट्स घेतल्या आहेत.