IPL Auction: ड्रग्ज प्रकरणानंतर आर्यन खान पहिल्यांदाच दिसला

Aryan Khan shown bidding for  Kolkata Knight Riders in IPL Auction
Aryan Khan shown bidding for Kolkata Knight Riders in IPL Auction esakal

बंगळुरू : आयपीएल 2022 चा दोन दिवसीय मेगा लिलाव (IPL Auction 2022) आजपासून सुरू झाला. या लिलावात आयपीएलमधील 10 संघांचे प्रशिक्षक, मालक आणि मेंटॉर उपस्थित आहेत. मात्र यंदाच्या लिलावात सर्वांची नजर होती ती कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) ऑक्शन टेबलकडे. कारण गेल्या लिलावात प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) उपस्थित राहणार की नाही ही उत्सुकता होती. ड्रग्ज प्रकरणानंतर आर्यन खान सार्वजनिक ठिकाणी फारसा दिसला नव्हता. मात्र आयपीएलच्या मेगा लिलावात आर्यन खानने उपस्थिती लावली. (Aryan Khan shown bidding for Kolkata Knight Riders in IPL Auction)

यंदाच्याही लिलावात आर्यन खान सक्रियरित्या सहभागी झाला होता. क्रुझ ड्रग्ज पार्टीत आर्यन खानला देखील अटक झाली होती. मात्र त्याला उच्च न्यायालयाने जामीन मुंजूर केला आहे. केकेआरने यंदाच्या लिलावात श्रेयस अय्यरला 12.25 कोटी रूपयाला खरेदी करून मोठा खेळाडू आपल्या कळपात सामिल करून घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com