IPL 2022 : पोलार्डच्या हातून बॅट अन् मुंबईच्या हातून सामना निसटला

Bat Slip from Kieron Pollard
Bat Slip from Kieron PollardESAKAL

मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलच्या 15 व्या हंगामातील (IPL 2022) दुसरा सामना देखील हरला. राजस्थान रॉयल्सच्या 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकात 8 बाद 170 धावांपर्यंतच मजल मराली. मुंबईकडून तिलक वर्मा आणि इशान किशन या दोन युवा फलंदाजांनी दमदार बॅटिंग करत अर्धशतके झळकावली. मात्र मुंबईचे रथी महारथी रोहित शर्मा आणि कायरॉन पोलार्ड (Kieron Pollard) अपयशी ठरले. कायरॉन पोलार्डला आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. तो 24 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. दरम्यान, फलंदाजी करताना त्याच्या हातून बॅट (Bat Slip) निसटली. कायरॉन पोलार्डचे आपल्या बॅटवर नियंत्रण नसल्याचे आजच्या सामन्यात दिसून आले.

Bat Slip from Kieron Pollard
MI vs RR : रोहित आउट झाला अन् रितिकाचा चेहरा पडला!

मुंबईने अखेरच्या काही षटकात चांगली गोलंदाजी करत राजस्थान रॉयल्सला 193 धावांवर रोखले. त्यानंतर इशान किशनने 43 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तर युवा तिलक वर्माने दमदार फटकेबाजी करत 33 चेंडूत 61 धावा चोपल्या. मात्र राजस्थानच्या गोलंदाजांनी या दोन सेट झालेल्या बॅट्समनला पाठोपाठ बाद करत मुंबईवर दबाव आणला. दरम्यान, मुंबईचा अनुभवी आणि एकहाती सामने जिंकून देणारा कायरॉन पोलार्डवर मुंबईला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आली होती. मात्र आक्रमक शैलीचा पोलार्ड आज आपल्या रंगात दिला नाही. त्याला राजस्थानच्या गोलंदाजांनी जखडून टाकले. त्यामुळे त्याला 24 चेंडूत फक्त 25 धावाच करता आल्या. ज्याप्रमाणे पोलार्डच्या हातून बॅट निसटली त्याच प्रमाणे पोलार्डच्या संथ बॅटिंगमुळे मुंबईच्या हातून सामना निसटला.

Bat Slip from Kieron Pollard
Video : शाहरूखच्या पोरीसमोरच अय्यरची 'शाहरूखगिरी'

राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 193 धावांपर्यंत मजल मराली. मात्र मुंबईला 20 षटकात 170 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईने 23 धावांनी हा सामना गमावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com