IPL 2023
IPL 2023 sakal

IPL 2023 : लखनौच्या फलंदाजांना सूर गवसला नाही, गतविजेत्या गुजरातचा आठवा विजय

लखनौवर ५६ धावांनी मात; रिद्धिमान साहा, शुभमन गिल, मोहित शर्मा चमकले

अहमदाबाद - शुभमन गिल (नाबाग ९४ धावा), रिद्धिमान साहा (८१ धावा) व मोहित शर्माच्या (४/२९) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने रविवारी येथे झालेल्या आयपीएल लढतीत लखनौ सुपर जायंटस्‌ संघावर ५६ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

गतविजेता गुजरात टायटन्सचा हा मोसमातील आठवा विजय ठरला, हे विशेष. त्यामुळे त्यांचे आता प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे स्थान जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यांनी गुणतालिकेतील पहिले स्थान कायम राखले. लखनौ सुपर जायंटस्‌ संघाला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

गुजरातकडून लखनौसमोर २२८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. काईल मेयर्स व क्वींटोन डी कॉक या सलामी जोडीने ८८ धावांची भागीदारी करताना आश्‍वासक सुरुवात केली. दोघांनीही गुजरातच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

दोघांची जोडी आणखी आक्रमक फलंदाजी करणार, असे वाटत असतानाच मोहित शर्मा गुजरातसाठी धावून आला. त्याच्या गोलंदाजीवर पुलचा फटका खेळताना मेयर्स ४८ धावांवर राशीद खानकरवी झेलबाद झाला. राशीदने धावत येऊन पकडलेला झेल लाजवाब होता. मेयर्सने आपल्या खेळीत ७ चौकार व २ षटकार मारले.

IPL 2023
Cricket Summer Camp : छोरीयां छोरों से कम हैं के! उन्हाळी क्रिकेट शिबीरांत मुलांच्या बरोबरीने सराव

त्यानंतर लखनौच्या फलंदाजांना सूर गवसला नाही. डी कॉक एकटा लढत होता; पण दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली नाही. दीपक हुडाला अजूनही सूर गवसलेला नाही. हे त्याच्यासाठी हानीकारक आहे. भारतीय संघात प्रवेश करण्याच्या त्याच्या आशांवर पाणी फेरले जाणार आहे.

मोहम्मद शमीने हुडाला (११ धावा) व मोहितने मार्कस स्टॉयनिसला (४ धावा) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर डी कॉकही बाद झाला. त्याने ४१ चेंडूंमध्ये ७ चौकार व ३ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. राशीद खानच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. लखनौला २० षटकांत ७ बाद १७१ धावांपर्यंतच मजल मारता आली. मोहितने २९ धावा देत ४ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

१४२ धावांची खणखणीत सलामी

IPL 2023
Mumbai : मुंबई महापालिका बांधणार सात मलजल प्रक्रिया केंद्रे

लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल व रिद्धिमान साहा या सलामी जोडीने १४२ धावांची खणखणीत सलामी भागीदारी रचत लखनौच्या गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली. दोघांनी या भागीदारीत नेत्रदीपक फटक्यांची आतषबाजी केली. साहाने ४३ चेंडूंमध्ये १० चौकार व ४ षटकारांसह ८१ धावांची मौल्यवान खेळी साकारली. आवेश खानच्या गोलंदाजीवर साहा बाद झाला.

२२७ धावांची फटकेबाजी

गुजरातने या लढतीत २० षटकांत २ बाद २२७ धावा फटकावल्या. गिलने ५१ चेंडूंमध्ये नाबाद ९४ धावांची आणखी एक देदीप्यमान खेळी केली. त्याने ही खेळी २ चौकार व ७ षटकारांनी सजवली. गिलचा दमदार फॉर्म या लढतीतही कायम राहिला. कर्णधार हार्दिक पंड्याने २५ धावांची आणि डेव्हिड मिलरने नाबाद २१ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक ः गुजरात टायटन्स २० षटकांत २ बाद २२७ धावा (रिद्धिमान साहा ८१, शुभमन गिल नाबाद ९४, हार्दिक पंड्या २५, डेव्हिड मिलर नाबाद २१, आवेश खान १/३४) विजयी वि. लखनौ सुपर जायंटस्‌ २० षटकांत ७ बाद १७१ धावा (काईल मेयर्स ४८, क्वींटोन डी कॉक ७०, मोहित शर्मा ४/२९).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com