
Cheteshwar Pujara : स्टीव्ह स्मिथही हैराण! WTC फायनलपूर्वी पुजाराने ठोकले सलग तिसरे शतक
Cheteshwar Pujara : भारतीय संघाचा अव्वल क्रमांकाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या आयपीएलचा भाग नाही. पण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपपूर्वी तो ऑस्ट्रेलियन संघाला घाबरवण्याची एकही संधी सोडत नाहीये.
ससेक्स काउंटी क्लबचा कर्णधार असलेल्या पुजाराने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये बॅक टू बॅक तिसरे शतक झळकावले आहे. हे शतकही खास आहे कारण ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथही त्याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.
चेतेश्वर पुजाराच्या नेतृत्वाखाली ससेक्स काउंटी क्लबकडून खेळण्याची स्टीव्ह स्मिथची ही पहिलीच वेळ होती. पुजारा आणि स्मिथमध्ये 61 धावांची भागीदारीही झाली. मात्र, स्मिथ 57 चेंडूत 30 धावा करून बाद झाला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून खेळला जाणार आहे. या मोठ्या सामन्यादरम्यान चेतेश्वर पुजारा आणि स्टीव्ह स्मिथ हे दोघेही खूप महत्त्वाचे खेळाडू आहेत.
पुजारा 151 चेंडूंचा सामना केल्यानंतर 125 धावा करून खेळत आहे. त्याचा स्ट्राइक रेट 81 पेक्षा जास्त आहे. पुजाराने आतापर्यंतच्या खेळीत 19 चौकार आणि एक षटकार मारला आहे. सहसा या फलंदाजाला संथ धावा केल्याबद्दल ट्रोल केले जाते. धावांपेक्षा जास्त चेंडू खेळण्यासाठी तो आधीच कुप्रसिद्ध आहे. या सामन्यादरम्यान असे घडले नाही. तो वेगाने धावा काढताना दिसला. यावेळी पुजारा द्विशतक झळकावेल अशी आशा चाहत्यांना आहे.