
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा सुरू होतेय. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. आता १७ मेपासून स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहे आणि ३ जूनला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे शेवटच्या टप्प्यात बरेच परदेशी खेळाडू माघार घेण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू आधीच भारतात पुन्हा यायला घाबरत आहेत, त्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी ऑसी खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यताही कमीच आहे. अशात आणखी एका बोर्डाने आपल्या खेळाडूंना राष्ट्रीय कर्तव्यावर परतण्याचे आदेश दिले आहेत.