IPL 2022 : धोनीच्या 'त्या' निर्णयानं किवी स्टारचं स्वप्न भंगलं

MS Dhoni And Ravindra Jadeja
MS Dhoni And Ravindra JadejaSakal

भारतीय संघाचा माजी कर्णधार आता चेन्नई सुपर किंग्जचाही माजी कॅप्टन झालाय. अचानक आपल्या निर्णयाने सर्वांना धक्का देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीनं (MS Dhoni) आयपीएलच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी संघाचे नेतृत्व सोडल्याची घोषणा केली. त्याची जागा आता रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) घेतली आहे. जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात जडेजाची देहबोली पाहून आयपीएलच्या यंदाच्या हंगामात तरी धोनीनं कॅप्टन्सी करायला हवी होती, असे अनेक क्रिकेट चाहत्यांना वाटले असेल. त्याने कधीच थांबू नये, अशी भावना त्याच्या चाहत्यांमध्ये नेहमीच पाहायला मिळाली. पण आता न्यूझीलंडच्या स्टार बॅटरनं धोनीसंदर्भातील एक खास गोष्ट शेअर केलीये.

MS Dhoni And Ravindra Jadeja
वॉशिंग्टनची 'सुंदर' बॅटिंग; पण 'सुर्यवंशम' मीम्स का होतेय व्हायरल?

न्यूझीलंडचा स्टार फलंदाज ड्वेन कॉन्वे (Devon Conway ) यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधीत्व करतोय. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्यास तो चांगलाच उत्सुक होता. धोनीच्या कॅप्टन्सीखाली खेळण्याचे स्वप्न घेऊन भारतात आलेल्या न्यूझीलंडच्या बॅटरची घोर निराशा झाली. धोनीनं कॅप्टन्सी सोडल्यामुळे त्याचे धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याचे स्वप्न अधूरेच राहणार आहे. कॉन्वेनं यासंदर्भात धोनीसोबत थेट चर्चा करुन आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली. एका मुलाखतीमध्ये त्याने यावर भाष्य केले आहे.

MS Dhoni And Ravindra Jadeja
IPL 2022 : चहलचा फ्लाईंग किस, धनश्री खुदकन हसली (VIDEO)

चेन्नई सुपर किंग्ज क्वॉन्वे म्हणाला की, मला धोनीच्या नेतृत्वाखआली खेळायचे होते. आणखी एका हंगामासाठी तू संघाचे नेतृत्व करु शकत नाहीस का? मला तुझ्या नेतृत्वाखाली खेळायचे होते, असा संवाद धोनीसोबत केल्याचा किस्सा त्याने शेअर केलाय. यावर धोनीने नो असे उत्तर दिले. जरी मी कॅप्टन नसलो तरी अवतीभवती असेनच, असे उत्तर धोनीने दिले. हे सांगताना तो अगदी कूल होता, असा उल्लेखही कॉन्वेनं केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com