
IPL 2023 David Warner: आधी कर्णधारपदावरून काढले नंतर संघातून वगळले! डेव्हिड वॉर्नरने उगवला सूड; पहा VIDEO
IPL 2023 David Warner Celebration : सलग पाच पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ हळूहळू विजयी मार्गावर परतत आहे. प्रथम संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला आणि त्यानंतर सोमवारी सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला.
या विजयासह दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबादकडून झालेल्या सर्व गोष्टींचा बदला घेतला.
डेव्हिड वॉर्नर बराच काळ सनरायझर्स हैदराबादशी जोडल्या गेला होता. 2016 मध्ये त्याने या संघाला चॅम्पियनही बनवले होते, पण वॉर्नरचा फॉर्म खराब होताच संघाने त्यालाही सोडले.
वॉर्नरची पाठराखण करण्याऐवजी त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले. यानंतर पुढच्याच सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले.
या हंगामात वॉर्नरची परिस्थिती आणि भावना सर्व बदलल्या. त्याचा फॉर्मही परत आला आणि कर्णधारपदही. ऋषभ पंतला संघातून वगळल्यामुळे डेव्हिड वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवण्यात आले. जेव्हा सनरायझर्स हैदराबादचा संघ वॉर्नरसमोर ऐसमध्ये आला तेव्हा या खेळाडूने जिंकण्यासाठी सर्वस्व दिले. (Latest Marathi News)
दिल्ली कॅपिटल्सने सामना जिंकताच वॉर्नरच्या आतला सगळा राग त्याच्या जल्लोषात सर्व भावना बाहेर आल्या. वॉर्नर पूर्ण आक्रमकतेने हा विजय साजरा करताना दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.