DC vs RCB : दिल्लीची दमदार बॅटिंग, सॉल्टच्या सॉलिड कामगिरीने मिळाला विजय

IPL 2023 RCB vs DC Live Score
IPL 2023 RCB vs DC Live Score

IPL 2023 RCB vs DC Live Score : रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा दिल्ली कॅपिटल्सने 7 विकेट्स राखून पराभव केला. दिल्लीने आरसीबीचे 182 धावांचे आव्हान 17 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात आरामात पार केले. दिल्लीकडून फिल्प सॉल्टने 87 धावांची दमदार खेळी करत एकहाती सामना जिंकून दिला. त्याला रिले रूसोने नाबाद 35 धावा करत चांगली साथ दिली.

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 4 बाद 181 धावा ठोकल्या. विराट कोहलीने 55 तर महिपाल लोमरोरने 54 धावा केल्या. फाफ ड्युप्लेसिसनेही 45 धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

सॉल्टची इनिंग संपली

दरम्यान, 16 व्या षटकात शतकाच्या जवळ पोहचलेला फिल्प सॉल्ट 45 चेंडूत 87 धावा करून बाद झाला. त्याला कर्ण शर्माने बाद केले. यानंतर अक्षर पटेल आणि रिले रूसोने दिल्लीच्या विजयाची औपचारिकता 17 व्या षटकात पार केली. रूसोने 21 चेंडूत 35 धावा केल्या. तर अक्षरने 3 चेंडूत नाबाद 8 धावा केल्या.

रुसो आणि सॉल्टची जोडी जमली

मात्र ही अर्धशतकी भागीदारी हर्षल पटेलने फोडली. त्यानंतर आलेला रिले रूसोने सॉल्टकडे डावाची सर्व सूत्रे सोपवत त्याला दुसऱ्या बाजूने फटकेबाजी करत साथ दिली. सॉल्टने जवळपास 190 च्या स्ट्राईक रेटने धावा दिल्लीला 15 षटकात 166 धावांपर्यंत पोहचवले. आता सामना 30 चेंडूत फक्त 16 धावा असा आला.

दिल्लीची दमदार सलामी

आरसीबीने ठेवलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपटिल्सने दमदार सुरूवात केली. सलामीवीर फिल्प सॉल्ट आणि डेव्हिड वॉर्नर यांना 60 धावांची सलामी दिली. त्यानंतर वॉर्नर 22 धावा करून बाद झाला. वॉर्नरनंतर आक्रमक खेळणाऱ्या सॉल्टला मिचेल मार्शने 26 धावा करून साथ दिली. दोघांनी दिल्लीला 10 षटकात 119 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, सॉल्टने आपले अर्धशतक पूर्ण केले. होते.

महिपालची दमदार फलंदाजी 

विराट कोहली बाद झाला त्यावेळी आरसीबीच्या 16 षटकात 137 धावा झाल्या होत्या. त्यानंतर महिपाल लोमरोरने आक्रमक फटकेबाजी करत 26 चेंडूत अर्धशतक झळकावले. हे त्याचे आयपीएलमधील पहिले अर्धशतक होते. याचबरोबर आरीसीबी 19 षटकात 3 बाद 172 धावांपर्यंत पोहचली होती.

शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने 11 धावा करून लोमरोरची साथ सोडली. त्यानंतर लोमरोर आणि रावतने शेवटच्या षटकात 9 धावा करत आरसीबीला 20 षटकात 4 बाद 181 धावांपर्यंत पोहचवले.

विराट कोहलीचे अर्धशतक

यानंतर विराट कोहली आणि महिपाल लोमरोर यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. दरम्यान, विराट कोहलीने हंगामातील आपले 6 वे अर्धशतक झळकावले. मात्र या अर्धशतकाचा आनंद फार काळ टिकला नाही. त्याला मुकेश कुमारने 55 धावांवर बाद केले.

आरसीबीला मार्शने दिले पाठोपाठ दोन धक्के

विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिसने आरसीबीला 82 धावांची सलामी दिल्यानंतर मिचेल मार्शने आरसीबीला पाठोपाठ दोन धक्के दिले. त्याने ड्युप्लेसिसला 45 धावांवर बाद केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलला शुन्यावर बाद करत मोठा धक्का दिला.

आरसीबी संघाचा पॉवरप्ले संपला

आरसीबी संघाचा पॉवरप्ले संपला आहे. त्याने सहा षटकांत बिनबाद 51 धावा केल्या आहेत. कर्णधार फाफ डुप्लेसिस 16 चेंडूत 29 आणि विराट कोहली 20 चेंडूत 22 धावांवर नाबाद आहे. डुप्लेसिसने आतापर्यंतच्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार मारला आहे. त्याचवेळी कोहलीच्या बॅटमधून तीन चौकार निघाले आहेत.

किंग कोहलीने रचला इतिहास! IPL मध्ये पूर्ण केल्या 7000 धावा

DC vs RCB Live Score: राजधानीत बंगलोरने जिंकले नाणेफेक! घेतला महत्त्वाचा निर्णय

आरसीबीने दिल्लीविरुद्ध नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकून कर्णधार फाफ डू प्लेसिसने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजधानीत दिल्ली घेणार आरसीबीविरुद्धच्या पराभवाचा बदला!

या मोसमात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. या मोसमाच्या सुरुवातीला जेव्हा हे दोन संघ आमनेसामने आले तेव्हा बेंगळुरूने बाजी मारली होती आणि आता दिल्लीच्या संघाला त्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com