IPL 2022 Auction: दिल्लीचे Mock Drill; आमरेंची नजर 'त्या' 7 खेळाडूंवर!

Delhi Capitals Mock Drill of IPL 2022 Mega Auction Pravin Amre says we looking for 7 players
Delhi Capitals Mock Drill of IPL 2022 Mega Auction Pravin Amre says we looking for 7 players esakal

बंगळुरू: आयपीएल 2022 लिलाव (IPL 2022 Mega Auction) 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये होणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटलची लिलावात उतरणारी टीम बंगळुरात पोहचली आहे. इतकेच नाही तर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) मुख्य लिलाव प्रक्रियेआधी लिलावाचे एक मॉक ड्रिल (Mock Drill) देखील करून पाहिले आहे. याबाबत दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रविण आमरे (Pravin Amre) यांनी आपल्या रणनीतीबाबत हिंट दिली.

Delhi Capitals Mock Drill of IPL 2022 Mega Auction Pravin Amre says we looking for 7 players
IPL 2022 Auction : अंबानींच्या बटव्यात राहिलेत किती?

दिल्लीने ऋषभ पंत (Rishabh Pant), अक्षर पटेल (Axar Patel), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि एन्रीच नोर्खिया (Anrich Nortje) यांना रिटेन केले आहे. दरम्यान, लिलाव प्रक्रिया अवघ्या एका दिवसावर आली असताना दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रविण आमरे यांनी दिल्लीचा लिलावात मुख्य उद्येश काय असणार आहे हे उघड केले. ते म्हणाला की, 'आम्ही प्रशिक्षक म्हणून आमचा कायमच संघ समतोल करण्याकडे कल असतो. चांगली गोष्ट म्हणजे आम्ही चार खेळाडू रिटेन केले. आमच्या संघात आता एक सलामीवीर, एक विकेटकिपर बॅट्समन, एक अष्टपैलू आणि एक वेगवान गोलंदाज आहे. आम्ही आमचा पाया मजबूत केला आहे.'

Delhi Capitals Mock Drill of IPL 2022 Mega Auction Pravin Amre says we looking for 7 players
VIDEO: 'चल भाग उधर' धोनीनंतर आता रोहितची 'माईकवाणी'

आमरे पुढे म्हणाले की, 'आता आम्हाला असे सात खेळाडू गरजेचे आहेत जे आमच्या संघाला अजून समतोल देतील. हाच आमचा लिलावातील मुख्य उद्येश असणार आहे आणि खरं सांगायचं तर हेच तर मोठे आव्हान आहे.' यंदाच्या आयपीएल लिलावात 8 नाही तर 10 संघ सहभागी असणार आहेत. आता गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनौ सुपरजायंट (Lucknow Super Giants) हे दोन संघ नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत.

Delhi Capitals Mock Drill of IPL 2022 Mega Auction Pravin Amre says we looking for 7 players
IPL Auction: या 5 भारतीय खेळाडूंवर 'छप्पर फाड के' बोली लावून फ्रेंचायजी फसली

याबाबत आमरे म्हणाले की, 'आयपीएल मेगा लिलाव (IPL Mega Auction) कायमच आव्हानात्मक असतो. आता तर दोन संघ वाढले आहेत. आम्हाला माहिती आहे की खूप चढाओढ असते. आम्हाला माहिती आहे की काही फ्रेंचायजींकडे जास्त पैसे आहेत. मात्र अशावेळीच तुमची विशेषता आणि लिलावातील अनुभव कामी येतो.' दिल्लीने चार खेळाडू रिटेन केल्यानंतर त्यांच्या पर्समध्ये 47.5 कोटी शिल्लक आहे. इतर संघांच्या तुलनेत त्यांच्याकडे सर्वात कमी पैसे शिल्लक राहिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com