IPL 2023 च्या पार्टीत महिलेसोबत गैरवर्तन; खेळाडूचे नाव गुलदस्त्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2023

IPL 2023 च्या पार्टीत महिलेसोबत गैरवर्तन; खेळाडूचे नाव गुलदस्त्यात

क्रिकेट विश्वात सध्या आयपीएल १६ सीझनचा फिव्हर पाहायाल मिळत आहे. मात्र, या सीझनला गालबोट लागले आहे. आयपीएलच्या पार्टीत एका स्टार खेळाडूने महिलेसोबत केलं गैरवर्तन केल्याचे धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. मात्र, खेळाडूचे नाव गुलदस्त्यात ठेवलं आहे. ( Delhi Capitals star misbehaves with woman at party franchise )

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर दिल्लीच्या एका खेळाडूने एका खासगी पार्टीत महिलेशी गैरवर्तन केले. खेळाडूचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही, पण आता फ्रँचायझीने या घटनेची गंभीर दखल घेऊन खेळाडूंसाठी कठोर नियम करण्यात आले आहेत.

रात्री 10 नंतर खेळाडूच्या रुममध्ये नो एन्ट्री

  • खेळाडूंच्या रुमममध्ये प्रवेश करण्यासाठी पाहुण्यांना परवानगी घेणं आवश्यक आहे.

  • त्याशिवाय रात्री 10 वाजल्यानंतर कुठल्याही पाहुण्याला परवानगी मिळणार नाही, हे दिल्ली फ्रेंचायजीने स्पष्ट केलय.

  • रुममध्ये जाण्यासाठी फोटो ओळखपत्र आणि आयपीएल अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे.

  • हॉटेलमधून बाहेर जाताना खेळाडूंना फ्रेंचायजीला सांगण बंधनकारक आहे.

  • पत्नी आणि गर्लफ्रेंड येऊ शकतात, पण स्वत:च्या खर्चाने

  • कुटुंबिय येत असतील, तर खेळाडूंना तस फ्रेंचायजीला सांगाव लागेल.

  • फ्रेंचायजीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, सर्व खेळाडूंना बंधनकारक असेल.

  • अचारसंहितेच उल्लंघन केल्यास दंड किंवा कॉन्ट्रॅक्ट रद्द होऊ शकतो.

दिल्ली कॅपिटल्सला या सीजनमध्ये विशेष प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. पॉइंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम तळाला आहे. 7 पैकी त्यांनी फक्त 2 सामने जिंकलेत.