IPL 2023 : गौतम गंभीरने असं काही केलं की जगाला बसला धक्का! व्हिडिओ झाला व्हायरल | Gautam Gambhir | Cricket News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gautam gambhir viral video commentators surprised to see the smiling ipl 2023 cricket news in marathi kgm00

IPL 2023 : गौतम गंभीरने असं काही केलं की जगाला बसला धक्का! व्हिडिओ झाला व्हायरल

IPL 2023 Gautam Gambhir : लखनौ सुपर जायंट्सचा मेंटर गौतम गंभीर नेहमीच गंभीर दिसतो. त्याचा रागही सर्वश्रुत आहे. कोणाचाही सामना करायला सुद्धा मागेपुढे न पाहणाऱ्या गौतम गंभीरने चाहत्याचीही बोलती बंद केली आहे.

कर्णधार केएल राहुलने गुजरात टायटन्सविरुद्ध संथ खेळी खेळली तेव्हा गंभीरचा लाल झालेला चेहरा पुन्हा पुन्हा पडद्यावर दिसू लागला. या सामन्यात लखनौला 7 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात गौतम गंभीर वेगळ्याच हावभावात दिसला आणि तो चर्चेचा विषय ठरला.

लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजाने प्रथम पंजाब किंग्जच्या गोलंदाजांना जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर गोलंदाजीतही संघाने आपला दबदबा कायम राखला. पंजाबच्या डावाच्या 18व्या षटकात जितेश शर्मा बाद होताच डगआऊटमध्ये उपस्थित असलेला गौतग गंभीर हसत हसत काही हातवारे करताना दिसला.

हे दृश्य पाहून समालोचकही आश्चर्यचकित झाले आणि हसू लागले. गंभीरचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियाही येत आहेत. काही चाहते गौतम गंभीरच्या हसण्याला आश्चर्य मानत आहेत.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. लखनौचा सलामीवीर काईल मायर्सने 24 चेंडूत 54, स्टॉइनिसने 40 चेंडूत 72, निकोलस पूरनने 19 चेंडूत 45 आणि आयुष बडोनीने 24 चेंडूत 43 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 5 गडी गमावून 257 धावा केल्या.

प्रत्युत्तरात पंजाब किंग्ज संघ 19.5 षटकांत 201 धावा करून बाद झाला. पंजाबकडून अथर्व तायडे (36 चेंडूत 66 धावा) याने सर्वाधिक धावा केल्या.

टॅग्स :IPLGautam Gambhir