
GT vs LSG : लखनौची आक्रमकता मोडून काढत गुजरातने जिंकला सामना
GT vs LSG IPL Match LIVE : अखेर पांड्या बंधूंमधील द्वंद्व हार्दिक पांड्याने जिंकले. गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 56 धावांनी मोठा पराभव करत आपले 11 पैकी 8 सामने जिंकून 16 गुणांसह अव्वल स्थान मजबूत केले. तसेच प्ले ऑफच्या रिंगणात आपला एका पाय टाकला.
गुजरातच्या 228 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या लखनौने चांगली सुरूवात केली खरी मात्र गुजरातच्या कसलेल्या गोलंदाजींने लखनौला 171 धावात रोखले. मोहित शर्माने 4 षटकात 4 विकेट्स घेत लखनौच्या फलंदाजीला मोठे खिंडार पाडले. लखनौकडून क्विंटन डिकॉकने सर्वाधिक 70 धावा केल्या.
आयपीएलच्या 51 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय फार महागात पडला. गुजरात टायटन्सने 20 षटकात 2 बाद 227 धावा ठोकत लखनौच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिलने 51 चेंडूत 94 धावा ठोकल्या. तर वृद्धीमान साहाने 43 चेंडूत 81 धावांची धडाकेबाज खेळी केली. लखनौकडून आवेश खान आणि मोहसीन खान यांनाच विकेट घेण्यात यश मिळाले.
लखनौचा डाव घसरला
दीपक हुड्डा बाद झाल्यानंतर आलेला मार्कस स्टॉयनिस 4 धावांची भर घालून माघरी परतला. त्यानंतर राशीद खानने 41 चेंडूत 70 धावांची खेळी करत झुंज देणाऱ्या क्विंटन डिकॉकला माघारी धाडत लखनौला मोठा धक्का दिला. पाठोपाठ पूरन देखील 3 धावा करून माघारी परतला. यामुळे कधी काळी 2 बाद 130 धावा असणाऱ्या लखनौची अवस्था 18 व्या षटकात 5 बाद 153 धावा अशी झाली.
यानंतर 11 चेंडूत 21 धावा करत आयुष बदोनीने हरलेली लढाई लढण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहितने त्याला बाद करत लखनौचा सहावा फलंदाज बाद केले. त्यानंतर कृणाल पांड्याला शुन्यावर बाद करत मोहितने आपला चौथा बळी टिपला. अखेर लखनौला 20 षटकात 7 बाद 171 धावाच करता आल्या गुजरातने 56 धावांची सामना जिंकला.
गुजरातने दिले दोन धक्के
गुजरातने दमदार सुरूवात करणाऱ्या लखनौला दोन धक्के दिले. मेयर्स बाद झाल्यानंतर क्विंटन डिकॉकने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्याचा जोडीदार दीपक हुड्डाला मोहम्मद शमीने 11 धावांवर बाद केले. त्याने या 11 धावा करण्यासाठी 11 चेंडू घेतले.
गुजरातच्या प्रत्युत्तरात लखनौचीही दमदार सुरूवात
गुजरात टायटन्सने ठेवलेल्या 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सने देखील दमदार सुरूवात केली. सलामीवीर कायल मेयर्स आणि क्विंटन डिकॉकने 8 षटकात 88 धावांची सलामी दिली अखेर मोहित शर्माने मेयर्सला 48 धावांवर बाद करत लखनौला पहिला धक्का दिला.
गुजरातच्या 227 धावा
पांड्याने 15 व्या षटकानंतर धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र तो 15 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. यानंतर शुभमन गिलने आक्रमक फटकेबाजी करत 51 चेंडूत नाबाद 94 धावा ठोकल्या. शेवटच्या षटकात नव्वदीत पोहचलेला गिल शतक पूर्ण करेल असे वाटत होते. मात्र त्याला ती संधी मिळाली नाही. गिलला साथ देणाऱ्या डेव्हिड मिलरने 12 चेंडूत 21 धावा ठोकल्या अन् गुजरातने 20 षटकात 2 बाद 227 धावांपर्यंत मजल मारली.
142-1 : शुभमन गिलचे अर्धशतक
वृद्धीमान साहाने अर्धशतक ठोकल्यानंतर गिअर बदलेल्या शुभमन गिलने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी 142 धावांची दमदार सलामी दिली. अखेर शुभमन गिलने 41 चेंडूत 83 धावांचा तडाखा देणाऱ्या वृद्धीमान साहाला बाद करत ही जोडी फोडली. साहा बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याला आल्या आल्या धावगती वाढवता आली नाही. त्यामुळे गुजरातची धावगती मंदावू लागली.
गिल - साहाची आठव्या षटकातच शतकी सलामी
पॉवर प्लेमध्ये धमाका केल्यानंतर साहाने त्यानंतरही आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवली. त्याला आता शुभमन गिल देखील साथ देऊ लागला होता. त्या दोघांनी गुजरातला आठव्या षटकातच शतकी मजल मारून दिली.
गुजरातने केली दमदार सुरूवात, साहाचे आक्रमक अर्धशतक
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सला पॉवर प्ले काही चांगला गेला नाही. गुजरातचे सलामीवीर वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी लखनौच्या गोलंदाजांची पहिल्या 6 षटकात धुलाई करत तब्बल 78 धावा ठोकल्या. वृद्धीमान साहाने तर 20 चेंडूत अर्धशतक ठोकले.
GT vs LSG LIVE: लखनऊने जिंकले नाणेफेक!
लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला