
IPL 2023 : 'सर्वतोपरी प्रयत्न केला पण...' दिल्लीकडून सामना हरल्यानंतर हार्दिक पांड्याला फलंदाजांवर संतापला
IPL 2023 Hardik Pandya : आयपीएल 2023 चा 44 वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 8 गड्यांच्या मोबदल्यात 130 धावा केल्या.
विजयासाठी 131 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी गुजरातचा संघ 6 विकेटच्या मोबदल्यात 125 धावाच करू शकला. अशाप्रकारे या सामन्यात दिल्लीने गुजरातचा 5 विकेट्सने पराभव केला. या सामन्यातील पराभवानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या नाराज दिसत होता.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या कमी धावसंख्येच्या सामन्यात हार्दिक पांड्याला पराभव पचवता आला नाही. सामन्यानंतर तो म्हणाला, मी सामना जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण अपयशी ठरलो. हे माझ्यासाठी वेदनादायक आहे. मध्येच काही मोठी षटके येतील अशी आशा होती पण आम्हाला लय सापडली नाही. त्यात विकेटची भूमिका महत्वाची होती. आम्हाला इथे खेळायची सवय आहे पण दिल्ली कॅपिटल्सने चांगली गोलंदाजी केली.
आम्हाला वेळ काढावा लागला तिथे आम्ही सुरुवातीच्या विकेट गमावल्या. विकेट्स गमावत राहिल्यास विजयाचा इरादा राखणे कठीण असते.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुढे म्हणाला, मला वाटते की फलंदाजांनी निराश केले. चेंडूने काही विशेष केले असे मला वाटत नाही. मोहम्मद शमीचे हे कौशल्य आहे ज्यामुळे तो अधिक विकेट घेऊ शकला. अन्यथा या विकेटमध्ये वेगवान गोलंदाजांसाठी विशेष काही नव्हते.