GT vs MI Qualifier 2 : गुजरातने मुंबईचा केला पराभव, सलग दुसऱ्या हंगामात पोहचली फायनलमध्ये | IPL 2023 | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GT vs MI Qualifier 2 LIVE

GT vs MI Qualifier 2 : गुजरातने मुंबईचा केला पराभव, सलग दुसऱ्या हंगामात पोहचली फायनलमध्ये

GT vs MI Qualifier 2 LIVE : शुभमन गिलच्या शतकी (129) खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 234 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईकडून तिलक वर्माने धडाकेबाज खेळी करत 14 चेंडूत 43 धावा चोपल्या. तर सूर्यकुमार यादवनेही 61 धावांची खेळी केली. मुंबईची धावगती जबरदस्त होती. मात्र गुजरातने मोक्याच्या क्षणी मुंबईच्या विकेट्स घेत त्यांचा डाव 171 धावात गुंडाळला. गुजरातकडून मोहित शर्माने 2.2 षटकात 5 विकेट्स घेत भेदक मारा केला. त्याने महत्वपूर्ण सूर्यकुमारची विकेट घेतली.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या मुंबईने गुजरातचा पॉवर प्लेमध्ये मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र शुभमन गिलने पॉवर प्लेनंतर धमाका करत हंगामातील तिसरे शतक ठोकले. गिलने 60 चेंडूत 129 धावा ठोकल्या. यात 10 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. त्याला साथ देणाऱ्या साई सुदर्शनने 43 तर हार्दिक पांड्याने 13 चेंडूत नाबाद 28 धावा ठोकत गुजरातला 20 षटकात 3 बाद 233 धावांपर्यंत पोहचवले.

सूर्याचे अर्धशतक मात्र..

ग्रीन बाद झाल्यानतंर सूर्यकुमार यादवने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने आपली धावगची वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने 15 व्या षटकातच दीडशतकी मजल मारून दिली. मात्र 38 चेंडूत 61 धावांची खेळी करणाऱ्या सूर्याला मोहित शर्माने चकवले आणि त्याचा त्रिफळा उडवला. मुंबईसाठी हा मोठा धक्का होता.

या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच मोहितने विष्णू विनोदलाही बाद केले. पाठोपाठ टीम डेव्हिड देखील अवघ्या 2 धावांची भर घालून परतला. जॉर्डननेही त्याच्या पावलावर पाऊल ठेवले. मुंबईची अवस्था 16 षटकात 8 बाद 168 धावा अशी झाली. अखेर मोहित शर्माने 10 धावात 5 विकेट्स घेत मुंबईचा डाव 171 धावात गुंडाळला आणि सामना 62 धावांनी जिंकला.

ग्रीन परतला

तिलक वर्मा 14 चेंडूत 43 धावा करून बाद झाला असला तरी त्याने संघासाठी मोठे काम केले. वर्मानंतर रिटायर्ड हर्ट झालेला कॅमरून ग्रीन मैदानावर परतला. त्याने सूर्यकुमारच्या साथीने दमदार भागीदारी रचत मुंबईला 10 षटकात 110 धावांपर्यंत पोहचवले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 52 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र जोशुआ लिटलने ग्रीनला 30 धावा बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला.

MI 112/3 (10.1)  : तिलक वर्माने लावलाय धडाका

ग्रीन दुखापतग्रस्त होऊन बाहेर गेला. रोहित बाद झाला आता मुंबईच्या हातून सामना गेला असे सर्वांना वाटले होते. मात्र सूर्यकुमारसोबत फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माने गुजरातला पॉवर प्लेमध्ये आपला दम दाखवून दिला. त्याने मोहम्मद शमी टाकत असलेल्या 5 व्या षटकात सलग चार चौकार मारत 24 धावा चोपल्या. त्याने याच षटकात मुंबईचे अर्धशतक धावफलकावर लावले. तिलक वर्माने 14 चेंडूत 43 धावा चोपल्या. मात्र पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवत मुंबईला मोठा धक्का दिला. मात्र वर्माच्या या धडाकेबाज फलंदाजीमुळे मुंबईने 6 षटकात 72 धावांपर्यंत मजल मारली होती.

21-2 (2.2 Ov) : ग्रीनने मैदान सोडलं, रोहितने केली निराशा 

सामन्याच्या दुसऱ्या षटकात हार्दिक पांड्याचा चेंडू कॅमरून ग्रीनच्या हाताला लागल्याने त्याला दुखापत झाली. WTC फायनल तोंडावर असताना दुखापत झाल्याने कॅमरून ग्रीन हिटायर्ड हर्ट झाला.

कॅमरून ग्रीन बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने चौकार मारत आपल्या इनिंगची सुरूवात केली. मात्र पुढच्याच षटकात रोहित शर्मा मोहम्मद शमीची शिकार झाला. तो 8 धावा करून माघारी परतला.

मुंबईला पहिल्याच षटकात धक्का

मुंबईचा नेहमीचा सलामीवीर इशान किशनला दुखापत झाल्याने त्याच्या ऐवजी नेहाल वधेरा सलामीला आला. मात्र मोहम्म शमीने त्याला पहिल्याच षटकात 4 धावांवर बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला.

एकटा शुभमन गिल भिडला.

संघाचे शतक 12 व्या षटकात धावफलकावर लावल्यानंतर शुभमन गिलने आपल्या इनिंगचा 5 वा गिअर टाकला. त्याने गेल्या सामन्यातील स्टार आकाश माधवाल, अनुभवी पियुष चावला यांचा खरपूस समाचार घेत षटकारांची बरसात केली. 12 व्या षटकात 21 आणि 13 व्या षटकात 20 धावा चोपत संघाला 15 व्या षटकात 150 धावांपर्यंत पोहचवले. शुभमन गिलने 49 चेंडूत आपले शतक पूर्ण करत हंगामातील तिसरे शतक ठोकले. यानंतरही गिलने आपला धडाका कायम ठेवला. त्याने 60 चेंडूत 129 धावा चोपल्या. यात 10 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. गिलने चौकार आणि षटकारांनीच 88 धावा केल्या.

साई सुदर्शनने 43 तर हार्दिक पांड्याने 13 चेंडूत नाबाद 28 धावा ठोकत गुजरातला 20 षटकात 3 बाद 233 धावांपर्यंत पोहचवले.

शुभमन गिलचे दमदार अर्धशतक

पॉवर प्लेमध्ये गुजरातला 6 षटकात 50 धावांपर्यंतच मजल मारता आली होती. त्यानंतर वृद्धामान साहा 18 धावा करून बाद झाला. मात्र सेट झालेल्या शुभमन गिलने दमदार फलंदाजीकरत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने सुदर्शनच्या साथीने गुजरातला 11 षटकात 98 धावांपर्यंत पोहवले.

GT 38/0 (5) : पॉवर प्लेमध्ये मुंबईचा प्रभावी मारा

मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये चांगला मारा करत दोन्ही सलामीवीरांना पहिल्या 4 षटकात मोठे फटके मारण्यापासून रोखले होते. मात्र शेवटच्या दोन षटकात गिल आणि साहाने फटकेबाजी करत गुजरातला पॉवर प्लेमध्ये 50 धावांपर्यंत पोहचवले. त्यात गिलला 31 धावांवर टीम डेव्हिडने जीवनदान दिले. मात्र पॉवर प्ले संपल्या संपल्या पियुष चावलाने 16 चेंडूत 18 धावा करणाऱ्या वृद्धीमान साहाला बाद करत गुजरातला पहिला धक्का दिला.

रोहितने नाणेफेक जिंकली

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित आजच्या सामन्यात चेस करणार आहे. त्याने संघात एक बदल केला असून ऋतिक शौकीनच्या ऐवजी कुमार कार्तिकेयला संधी दिली आहे.

पावसाची उसंत

पाऊस थांबल्यामुळे खेळपट्टीवरील कव्हर हटवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नाणेफेक 7.45 आणि सामना 8 वाजता सुरू होणार आहे.

सामना पावसामुळे होऊ शकला नाही तर काय? 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा

PL 2023 MI vs GT : क्वालिफायर-2 रद्द झाला तर कोण जाणार फायनल मध्ये?

पावसाचा व्यत्यय नाणेफेकीत उशीर

नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाऊस पडल्याने नाणेफेकीस उशीर होत आहे.