Ravichandran Ashwin : WTC Final पूर्वी भारताला मोठा धक्का, बुमराह, केएल झाला आता आर. अश्विनही... | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravichandran Ashwin PBKS vs RR

Ravichandran Ashwin : WTC Final पूर्वी भारताला मोठा धक्का, आता आर. अश्विनही...

Ravichandran Ashwin PBKS vs RR : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जून रोजी WTC Final होणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारताला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आधीच संघातील अनेक खेळाडू हे दुखापतीमुळे WTC Final ला मुकले आहेत. आता रविचंद्रन अश्विननेही चिंता वाढवली आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा रविचंद्रन अश्विन पंजाब किंग्जविरूद्धचा लीग स्टेजमधील शेवटचा सामना खेळत नाहीये. त्याला विश्रांती दिली नसून त्याच्या पाठीला दिखापज झाली आहे.

राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात ऐनवेळी आपल्या संघात एक बदल केला. त्यांचा अव्वल फिरकीपटू आर अश्विनच्या पाठीत दुखू लागल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. भारतीय संघ 7 जूनला ऑस्ट्रेलियाविरूद्ध WTC ची फायनल खेळणार आहे. यासाठी फक्त 18 दिवस शल्लक आहेत. त्यातच अश्विनला दुखापत झाल्याने सर्वांनाच चिंता वाटत आहे. अश्विनची पाठदुखी ही काही आताची नाहीये. त्याला यापूर्वी सिडनी कसोटीत तो सुजलेल्या पाठीनिशी खेळला होता. त्यानंतर त्याला गाबा कसोटीला मुकावे लागले होते. या सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला होता.

भारतीय संघ WTC final च्या तोंडावर दुखापतींनी ग्रासला आहे. जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि केएल राहुल या कसोटीला मुकले असून श्रेयस अय्यरही या कसोटीतून बाहेर पडला आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव हे देखील दुखापतींशी झुंजत आहेत.

WTC साठीचा भारतीय संघ :

रोहित शर्मा, शुभमन गिल, चतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

(Sports Latest News)