आयपीएल : गुजरात आणि राजस्थान यांच्यात आज शर्थीची झुंज

नव्याची नवलाई की इतिहासाची पुनरावृत्ती ?
Indian Premier League IPL 2022 Gujarat vs Rajasthan final today battles within a battle rajasthan royals vs gujarat titans shami buttler pandya chahal
Indian Premier League IPL 2022 Gujarat vs Rajasthan final today battles within a battle rajasthan royals vs gujarat titans shami buttler pandya chahalsakal

अहमदाबाद : आयपीएलच्या १५ व्या मोसमाची उद्या सांगता होत असताना पदार्पणातच विजेतेपद मिळवण्याची नवलाई गुजरातचा संघ दाखवणार की, पहिलेवहिले विजेते (२००८) राजस्थान उद्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार? याची उत्सुकता शिगेस पोहचली आहे. यंदा या दोघांमध्ये झालेल्या दोन्ही लढतीत गुजरातने विजय मिळवलेला असल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे, परंतु गेल्या दोन सामन्यातील फॉर्म पहाता राजस्थानचा संघही तोडीस तोड आहे.

गुजरात व राजस्थान यांच्यामध्ये आतापर्यंत दोन लढती पार पडल्या आहेत. साखळी फेरीच्या लढतीत गुजरातकडून राजस्थानला हार पत्करावी लागली. त्यानंतर हे दोन संघ क्वॉलिफायर एकच्या लढतीत एकमेकांसमोर उभे ठाकले. याही लढतीत गुजरातनेच बाजी मारली. हार्दिक पंड्याच्या संघाने दोन्ही लढतींत विजय मिळवून राजस्थानवर वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे आयपीएल अंतिम फेरीच्याआधी याच संघाचे पारडे जड आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

बटलरचा अडथळा

जोस बटलरने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने १६ सामन्यांमध्ये ४ शतके व ४ अर्धशतकांसह ८२४ धावा फटकावल्या आहेत. त्याने १५१.४७ च्या स्ट्राईक रेटने तर ५८.८६ च्या सरासरीने धावा फटकावल्या आहेत. विराट कोहलीने २०१६ मध्ये झळकावलेल्या चार शतकांच्या विक्रमाचीही त्याने बरोबरी साधली आहे. गुजरात व जेतेपद यांच्यामध्ये बटलरचा अडथळा असणार आहे. मोहम्मद शमी, राशीद खान, अल्जारी जोसेफ, यश दयाल या गुजरातच्या गोलंदाजांसमोर बटलरला रोखण्याचे आव्हान असणार आहे.

पंड्या, गिल, मिलर, तेवतिया, राशीदवर मदार

गुजरातच्या संघाने या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या संघातील प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी ओळखून खेळ केला आहे. हार्दिक पंड्या (४५३ धावा व ५ बळी), शुभमन गिल (४३८ धावा), डेव्हिड मिलर (४४९ धावा), राहुल तेवतिया (२१७ धावा), राशीद खान (१८ बळी, ९१ धावा), मोहम्मद शमी (१९ बळी) या खेळाडूंनी महत्त्वाच्या क्षणी गुजरातसाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. आता अजिंक्यपद त्यांच्यापासून एक पाऊल दूर आहे.

साखळी फेरीतील कामगिरी

राजस्थान

सामने : १४, विजय : ९, पराभव : ५, गुण : १८, स्थान ः दुसरे

साखळी फेरीतील कामगिरी

गुजरात

सामने : १४, विजय : १०, पराभव : ४, गुण : २०, स्थान : पहिले

गुजरात - राजस्थानची एकमेकांसमोर कामगिरी

पहिली साखळी लढत

१४ एप्रिल- गुजरातचा ३७ धावांनी विजय

पहिली क्वॉलिफायर लढत

गुजरात ७ गडी राखून विजयी

आयपीएलचे आतापर्यंतचे विजेते

  • मुंबई इंडियन्स - ५ वेळा

  • चेन्नई सुपरकिंग्ज - ४ वेळा

  • कोलकता नाईट रायडर्स - २ वेळा

  • सनरायझर्स हैदराबाद - १ वेळा

  • राजस्थान रॉयल्स - १ वेळा

  • डेक्कन चार्जर्स - १ वेळा

आयपीएल अंतिम लढत

गुजरात टायटन्स - राजस्थान रॉयल्स

नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

रात्री ८ वाजता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com