IPL Points Table : CSK टॉपला; गत विजेता MI तळाला

नेट रनरेटच्या जोरावर चेन्नईने अव्वल स्थानावर कब्जा केलाय.
IPL Points Table : CSK टॉपला; गत विजेता MI  तळाला

IPL 2021 Points Table : सुपर संडेच्या डबल हेडर लढतीनंतर चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान झालाय. त्याच्यापाठोपाठ दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी 10 पैकी 8 सामने जिंकले असून 2 सामने गमावले आहेत. नेट रनरेटच्या जोरावर चेन्नईने अव्वल स्थानावर कब्जा केलाय.

सुपर संडेच्या डबल हेडर लढतीतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दोन विकेट राखून विजय नोंदवला. या विजयासह त्यांनी प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. (अधिकृतरित्या यासंदर्भात घोषणा झाली नसली तरी 16 गुण मिळवणाऱ्या संघाचे स्थान पक्के होत असते.) प्ले ऑफच्या शर्यतीती चेन्नई आणि दिल्ली हे सेफ झोनमध्ये आहेत.

IPL Points Table : CSK टॉपला; गत विजेता MI  तळाला
IPL 2021 : यंदा मुंबईचं काही खरं नाही; बंगळुरुसमोर पुन्हा टेकले गुडघे

दुसऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सला मोठ्य़ा फरकाने पराभूत केले. मुंबईला या सामन्यात 54 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या विजयानंतर राजस्थान रॉयल्स संघाने 10 सामन्यापैकी 6 विजय आणि 4 पराभवासह 12 गुण मिळवले असून गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांचे नेट-रनरेट मात्र निगेटिव्हमध्ये आहे.

IPL Points Table : CSK टॉपला; गत विजेता MI  तळाला
IPL Record : विकेटमागे धोनीला तोड नाही!

कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स अनुक्रमे चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. प्ले ऑफसाठी मुंबई इंडियन्ससमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कोलकाता संघाने 10 पैकी 4 सामन्यात विजय नोंदवला आहे. त्यांच्या खात्यात 8 गुण आहेत. पंजाब आणि मुंबईची परिस्थितीही सेम टू सेम असून नेट रनरेटमध्ये कोलकाता फायद्यात असून पंजाबला आणि मुंबई इंडियन्सला निगेटिव्ह नेट रनरेटचा फटका बसला आहे. मुंबई इंडियन्सच्या नंतर सर्वात तळाला सनरायझर्स हैदराबाद आहे. त्यांना 9 पैकी एकच सामना जिंकला आहे. दुसरीकडे राजस्थानने देखील 9 सामने खेळले असून त्यांनी 9 पैकी 4 सामन्यात विजय नोंदवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com