esakal | IPL 2021: "प्रत्येक वादात अश्विनच का असतो?"; शेन वॉर्नचा तिखट सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Ashwin-IPL-Shane-Warne

रविचंद्रन अश्विनच्या बाबतीत एक विचित्र प्रसंग घडला...

"प्रत्येक वादात अश्विनच का असतो?"; शेन वॉर्नचा तिखट सवाल

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 KKR vs DC Highlights: टेबल टॉपर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या दिल्लीला खराब फलंदाजीचा फटका बसला. करो या मरोचा सामना खेळणाऱ्या कोलकाता संघाने दिल्लीला पराभूत केले. दिल्लीच्या फलंदाजांनी २० षटकांत केवळ १२७ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ आणि ऋषभ पंत या दोघांनीही प्रत्येकी ३९ धावा केल्या. पण त्यांच्या खेळीचा दिल्लीला फारसा फायदा होऊ शकला नाही. १२८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या नितीश राणाने शेवटपर्यंत खिंड लढवत नाबाद ३६ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर अश्विन आणि मॉर्गन यांच्यातील वादाची चांगलीच चर्चा झाली. त्या वादावर शेन वॉर्नने आपलं मत नोंदवलं.

हेही वाचा: IPL 2021: RCB राजस्थानचा डाव उधळणार की RR कमबॅक करणार?

दिल्लीची फलंदाजी सुरू असताना रविचंद्रन अश्विन खेळत होता. अश्विन एक अतिरिक्त धाव काढण्याच्या तयारीत असताना त्याचा कोलकाताच्या खेळाडूशी वाद झाला. हा वाद तेथेच थांबला नाही. दिल्लीच्या डावात शेवटच्या षटकात हा वाद झाला. राहुल त्रिपाठीने फेकलेला थ्रो ऋषभ पंतला लागला आणि चेंडू दुसऱ्या बाजूला गेला. ते पाहून अश्विन अतिरिक्त धाव घेण्यास धावला. त्यावरून त्याच्यात आणि KKRचा कर्णधार मॉर्गन यांच्यात थोडीशी बाचाबाची झाली. या वादावर मतमतांतरे होती. पण शेन वॉर्नने मात्र अतिशय रोखठोक मत मांडलं.

हेही वाचा: Video: कार्तिक मागे असतानाच पंतने झपकन फिरवली बॅट अन्...

काय म्हणाला शेन वॉर्न?

अश्विन आणि मॉर्गन यांच्यात झालेला वाद पाहिल्यानंतर मला वाटतं की त्यावरून मतमतांतरे होऊ नयेत. अश्विनने जे केलं ते चुकीचंच होतं. असं पुन्हा होऊ नये असं मला स्पष्टपणे वाटतं. दर वेळी जे वाद होतात, त्यात नेहमी अश्विनच कसा काय असतो? मला असं वाटतं की अश्विनने जे काही केलं त्यावर भाष्य करण्याचा आणि जहरी टीका करण्याचा संपूर्ण अधिकार इयॉन मॉर्गनला आहे, अशा शब्दात शेन वॉर्नने अश्विनला सुनावलं.

याआधीदेखील, रविचंद्रन अश्विन आणि जॉस बटलर यांच्यात मंकडिंगच्या मुद्द्यावरून वाद झाला होता.

loading image
go to top