MI vs PBKS : पंजाबसमोर मुंबईकरांचा भांगडा!

स्पर्धेतील आव्हान टिकून ठेवण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा होता.
MI vs PBKS : पंजाबसमोर मुंबईकरांचा भांगडा!

IPL 2021, MI vs PBKS : सौरभ तिवारीची 45 धावांची आश्वासक खेळी आणि त्यानंतर हार्दिक पांड्या आणि पोलार्डने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने अखेर विजय नोंदवला. शेवटच्या षटकापर्यंत रगंलेला सामना जिंकत मुंबई इंडियन्सने प्ले ऑफच्या शर्यतीतील आपली दावेदारी कायम राखली आहे. दुसरीकडे पंजाबच्या अडचणी वाढल्या आहेत.

पंजाब विरुद्ध 6 विकेट्सनी विजय नोंदवत मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहचला आहे. मुंबई इंडियन्सच्या डावातील 14 व्या षटकात अर्शदीप सिंगने हार्दिक पांड्याचा झेल सोडला होता. त्यावेळी हार्दिक पांड्या अवघ्या 7 धावांवर खेळत होता. हा झेल पंजाबसाठी चांगलाच महागात पडला. हार्दिक पांड्याने 30 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 40 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला केरॉन पोलार्डनेही गरजेच्या वेळी आपल्या भात्यातून मोठे फटके खेळले. त्याने 7 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 15 धावांची खेळी केली. पंजाबकडून बिश्नोईनं सर्वाधिक 2 तर नॅथन एलिस आणि मोहम्मद शमी यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.

अबुधाबीच्या मैदानात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्पर्धेतील आव्हान टिकून ठेवण्यासाठी दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा होता. पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली.

MI vs PBKS : पंजाबसमोर मुंबईकरांचा भांगडा!
VIDEO : 'सूर्या'च्या खेळीला पुन्हा ग्रहण; रविनं उडवल्या दांड्या

धावफलकावर 36 धावा असताना मनदीप माघारी फिरला. ख्रिस गेल पुन्हा अपयशी ठरला. पोलार्डने एकाच षटकात त्याच्यासह लोकेश राहुलची विकेट घेतली. मध्यफळीतील मार्करमच्या 29 चेंडूतील 42 धावा आणि दीपक हुड्डाने केलेल्या 28 धावांच्या जोरावर पंजाबने निर्धारित 20 षटकात 6 विकेच्या मोबदल्यात 135 धावा केल्या. पोलार्ड-बुमराह प्रत्येकी दोन तर राहुल चाहर आणि क्रुणाल पांड्या यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

मुंबई इंडियन्सने 6 गडी राखून नोंदवला विजय

92-4 : आश्वासक खेळी करणारा सौरभ तिवारी तंबूत, त्याने 37 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 45 धावांची खेळी केली

61-3 : मोहम्मद शमीनं क्विंटन डिकॉकला बोल्ड करत पंजाबला पुन्हा सामन्यात आणले आहे. क्विंटन डिकॉकने 29 चेंडूत 27 धावांची खेळी केली.

16-2 : सूर्यकुमार आल्यापावली माघारी, बिश्नोईन उडवल्या दांड्या

16-1 : रोहितच्या रुपात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, बिश्नोईला मिळाले यश

पंजाब किंग्जने निर्धारित 20 षटकात 6 बाद 135 धावा केल्या आहेत.

123-6 : बुमराहच्या खात्यात आणखी एक विकेट, मनिष पांड्ये 28 धावांची भर घालून परतला

109-5 : राहुल चाहरनं लावला मार्करमच्या खेळीला ब्रेक, त्याने 29 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने 42 धावांची खेळी केली

48-4 : निकोलस पूरनही स्वस्तात परतला, बुमराहनं दिला दणका

41-3 : लोकेश राहुलच्या रुपात पंजाबला मोठा धक्का, पोलार्डचे दुसरे यश

39-2 : गेल स्वस्ता माघारी, पोलार्डच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्यानं घेतला झेल

36-1 मनदीपच्या रुपात पंजाबला पहिला धक्का, क्रुणाल पांड्याला मिळाले यश

असे आहेत दोन्ही संघ

Mumbai Indians Squad

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, केरॉन पोलार्ड, नॅथन कुल्टन नील, राहुल चाहर, जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट.

Punjab Kings Squad

केएल राहुल (कर्णधार/यष्टिरक्षक), मनदीप सिंग, ख्रिस गेल, एडन मार्करम, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.

रोहित शर्माने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com