IPL Playoff Race : KKR vs RR मॅचवर असतील MI च्या नजरा!

ज्या राजस्थानला नमवून मुंबईने स्पर्धेतील आशा पल्लवित केल्या आहेत त्यांनी जिंकावं, अशी प्रार्थना मुंबई इंडियन्सवाले चाहते निश्चितच करतील.
RR vs KKR
RR vs KKR

IPL 2021, Playoff Race : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील 52 व्या सामन्यानतंर प्ले ऑफमधील टॉपचे संघ निश्चित झाले. हैदराबाद विरुद्धच्या पराभवामुळे बंगळुरुचे टॉप 2 मध्ये पोहचणे अशक्य झाले असून फायनलासाठी त्यांना एलिमेटरचा सामना खेळावा लागणार हे निश्चित झाले आहे. त्यासाठीचा चौथा संघ अद्याप गुलदस्त्यातच आहे. हे चित्र मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर स्पष्ट होईल. त्यापुर्वी 7 आक्टोबरला कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामनाही तितकाच महत्त्वपूर्ण असेल. ज्या राजस्थानला नमवून मुंबईने स्पर्धेतील आशा पल्लवित केल्या आहेत त्यांनी जिंकावं, अशी प्रार्थना मुंबई इंडियन्सवाले चाहते निश्चितच करतील.

RR vs KKR
IPL 2021 Points Table : SRH नं कोहलीच्या RCB चं गणित बिघडवलं

याशिवाय हैदराबादकडून दणका बसणार नाही, याचीही हूरहूर मुंबईकरांना लागून असेल. उर्वरित चौथ्या जागेसाठी 14 गुण मिळवणारा संघ पात्र ठरणार की 12 गुणांसह रनरेटच्या आधारावर आश्चर्यकारक निकालाची अनुभूती येणार यासंदर्भातील चित्र पुढील काही लढतीनंतरच स्पष्ट होईल. जाणून घेऊयात काय असतील चौथ्या संघाच्या प्लेऑफसाठीच्या एन्ट्रीसाठीचं समीकरणे....

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स लढत Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals

जर कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्स विरुद्ध विजय नोंदवला तर त्यांच्या खात्यात 14 गुण जमा होतील. सध्याच्या घडीला त्यांचे रनरेट उत्तम आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढतील. दुसरीकडे राजस्थानने हा सामना जिंकला तर त्यांच्या खात्यात 12 गुण जमा होतील. आणि मुंबईसाठी पेपर थोडा सोपा होईल. तसेच 14 गुणांच गणित 12 थोडेफार 12 गुणाकडे झुकेल.

RR vs KKR
Video : विल्यमसनमध्ये संचारला सुपरमॅन, अप्रतिम थ्रो करुन फिरवली मॅच

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज Chennai Super Kings vs Punjab Kings

या सामन्यासोबतच गुरुवारी दुबईच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत होणार आहे. ही लढतही स्पर्धेत आणखी ट्विस्ट आणू शकते. जर सरप्राईजरित्या पंजाबने चेन्नईला दणका दिला तर तेही 12 गुणांपर्यंत पोहचू शकतात. चेन्नई सुपर किंग्जला यामुळे काहीही फरक पडणार नाही.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians

शुक्रवारी शारजाच्या मैदानात रंगणारा हा सामना मुंबई इंडियन्ससाठी आशेची किरणं निर्माण करणारा असाच आहे. जर कोलकाताने राजस्थानला पराभूत केले. तर मोठ्या फरकाने हैदराबादला पराभूत करुन रनरेटच्या जोरावर मुंबई इंडियन्स कोलकात्त्याला फाईट देण्याच्या अडचणीत सापडतील हे गणित खूपच क्लिष्ट असणार आहे. पण जर राजस्थानने कोलकाताला पराभूत केले तर हैदराबादसोबतचा सामना जिंकून ते 14 गुणासह चौथ्या स्थानावर पोहचतील. इथंही 12 गुणांच समीकरण निर्माण होण्याला वाव आहे.

समजा कोलकाताला राजस्थानने हरवले आणि मुंबईला हैदराबादने हरवले तर या परिस्थितीत कोलकाता, मुंबई, राजस्थान हे तीन संघासमोर 12 गुण दिसू शकतात. चौथा संघ हा रनरेटच्या आधारावर ठरेल. चेन्नईला पराभूत करुन पंजाबही या शर्यतीत दिसू शकतो. पुन्हा इथंही पारडं जड असेल ते कोलकाताचे कारण इतर संघाच्या तुलनेत त्यांचे नेट रनरेट प्लसमध्ये आहे.

थेट समीकरण मांडायचं झाल तर ...

कोलकाताने राजस्थानला आणि मुंबईनं हैदराबादला पराभूत केलं तर रनरेटच्या जोरावर या दोन्ही संघातील एक संघ चौथ्या क्रमांकावरील जागा निश्चित करेल.

राजस्थानने कोलकाताला पराभूत केले आणि मुंबई इंडियन्सकडून हैदराबादला तर मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानी पोहचेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com