MI विरुद्ध RCBच्या हर्षलची खतरनाक हॅटट्रिक; पाहा व्हिडिओ

हे षटक त्याच्या आयपीएलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय ठरले.
Harshal Patel
Harshal PatelTwitter

IPL 2021 RCB vs MI : यंदाच्या हंगामात जबरदस्त फार्मात असलेल्या बंगळुरुच्या ताफ्यातील हर्षल पटेलनं (Harshal Patel) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (Mumbai Indians) सामन्यात हॅटट्रिकची नोंद केली. सतराव्या षटकात मुंबई इंडियन्सच्या मॅच विनर खेळाडूंना 'बॅक टू बॅक' तंबूत धाडत हर्षल पटेलनं रॉयल चॅलेंजर्सची सामन्यावरील पकड मजबूत केली. मुंबई इंडियन्सच्या डावातील सहाव्या षटकात विराट कोहलीने हर्षल पटेलच्या हाती चेंडू सोपवला होता. यावेळी त्या एकही यश मिळाले नव्हते.

या षटकात त्याने वाइडच्या एका अंवातर धावेसर एकूण चार धावा खर्च केल्या. कोहलीने पुन्हा 13 व्या षटकात हर्षलला बोलवले. या षटकात हर्षल पटेलनं एक वाइड एक लेग बाइजसह 7 धावा खर्च केल्या. सतराव्या षटकात पुन्हा त्याने वाइडनेच सुरुवात केली पण हे षटक त्याच्या आयपीएलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय ठरले.

Harshal Patel
IPL 2021 : यंदा मुंबईचं काही खरं नाही; बंगळुरुसमोर पुन्हा टेकले गुडघे

मुंबई इंडियन्सच्या संघाला 24 चेंडूत 61 धावांची आवश्यकता होती. हार्दिक पांड्या आणि पोलार्ड ही जोडी मैदानात असल्यामुळे मुंबईच्या चाहत्यांना सामना शेवटपर्यंत जाईल, याची खात्री होती. पण हर्षल पटेलनं याच ओव्हरमध्ये मुंबईच्या आशेला सुरुंग लावला. पहिला चेंडू वाइड टाकल्यानंतर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात हार्दिक पांड्या कोहलीच्या हाती झेल सोपवून परतला. कॅच हवेत उडल्यामुळे दोघांनी क्रॉस केले असल्यामुळे दुसरा चेंडू पोलार्डने खेळला. त्याच्या दांड्या उडवत हर्षल पटेल हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर पोहचला.

Harshal Patel
IPL Record : विकेटमागे धोनीला तोड नाही!

मुंबई इंडियन्सच्या तगड्या गड्यांना तंबूत धाडल्यानंतर राहुल चाहरसारख्या फिरकीपटूला चकवा देताना त्याने कोणतीही चूक केली नाही. त्याला पायचित करत त्याने हॅटट्रिक पूर्ण केली. वैयक्तिक चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने मिल्नेला बाद करत मुंबईचा खेळ खल्लास केला. यापूर्वी तिन्ही षटकात त्याने किमान एक अवांतर धाव दिली हे त्याच्या षटकाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com