esakal | IPL 2021 RR vs RCB: बंगळुरू राजस्थानचा डाव उधळणार की RR कमबॅक करणार? | Virat Kohli vs Sanju Samson
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Kohli-Sanju-Samson

राजस्थानच्या संघासाठी आजचा विजय अत्यावश्यक

IPL 2021: RCB राजस्थानचा डाव उधळणार की RR कमबॅक करणार?

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 RR vs RCB: राजस्थान रॉयल्स संघाचा आज बंगळुरू संघाविरूद्ध सामना रंगणार आहे. राजस्थानच्या संघाने या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पंजाब किंग्सविरूद्ध अतिशय थरारक असा विजय मिळवला होता. पण दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोनही संघांनी राजस्थानला सहज धूळ चारली. अशा परिस्थितीत बंगळुरूविरूद्धचा सामना गमावणं राजस्थानला परवडणार नाही. राजस्थानचा संघ १० सामन्यात केवळ ४ विजयांसह आणि ८ गुणांसह सातव्या स्थानी आहे. पुढील उर्वरित चारही सामने जिंकल्यास त्यांना प्ले-ऑफ्सची संधी मिळू शकेल. त्यामुळे आजचा विजय राजस्थानसाठी अत्यावश्यक आहे.

दुसरीकडे, स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात बंगळुरू संघाने पहिला सामना अतिशय लाजिरवाण्या पद्धतीने हारला. कोलकाता संघाने त्यांना एकतर्फी पराभूत केले होते. त्यानंतर CSKच्या संघाकडूनही RCB ला पराभवाचा धक्का बसला. पण, मुंबईविरूद्ध बंगळुरू संघाने एकतर्फी सामना जिंकला. ५४ धावांनी पराभूत करत बंगळुरूने मुंबई संघाला जिव्हारी लागणारा पराभव दिला. आता बंगळुरूकडे आणखी ४ सामने शिल्लक असून आजचा सामना जिंकल्याने त्यांची प्ले ऑफ्सची दावेदारी आणखी भक्कम होऊ शकेल.

राजस्थान आणि बंगळुरू या दोन संघांमध्ये आतापर्यंतच झालेल्या सामन्यांमध्ये दोन्ही संघ समतोल आहेत. पण दुसऱ्या टप्प्यातील आतापर्यंत झालेल्या कामगिरीकडे पाहता राजस्थानच्या संघावर विराटचा RCB संघ भारी पडू शकतो असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त होत आहे. कोहलीचा परतलेला फॉर्म आणि मॅक्सवेलची तडाखेबाज फलंदाजी याचे राजस्थानपुढे विशेष आव्हान असणार आहे. तर, दुसरीकडे संजू सॅमसनला आपल्या युवा गोलंदाजांकडून खूप अपेक्षा असणार आहेत.

loading image
go to top