esakal | Video: पोलार्डने लांबून थेट स्टंपवर मारला थ्रो अन् धवन माघारी | IPL 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Video: पोलार्डने लांबून थेट स्टंपवर मारला थ्रो अन् धवन माघारी

शिखर धवनचा एक धाव चोरण्याचा होता प्रयत्न

Video: पोलार्डने लांबून थेट स्टंपवर मारला थ्रो अन् धवन माघारी

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 MI vs DC Video: दिल्लीविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने २० षटकात १३० धावांपर्यंत मजल मारली. मुंबईसाठी हा सामना जिंकणे आवश्यक असल्याने फलंदाजांकडून संघाला खूप अपेक्षा होत्या. पण मुंबईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करणं शक्य झालं नाही. सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ३३ धावा केल्या. तर जयंत यादवने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी केल्याने संघाला १३० धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन स्वस्तात बाद झाला.

हेही वाचा: Viral Video: इशान किशनची सुरू होती हिरोपंती अन् तितक्यात...

१३१ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीची स्टार सलामी जोडी उतरली होती. दोघे चांगल्या लयीत असल्याने त्यांना झटपट बाद करणं आवश्यक होतं. जयंत यादवच्या गोलंदाजीवर शिखर धवनने आधी षटकार लगावला. त्यानंतर लगेच त्याने एकेरी धाव चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलार्डने अत्यंत चपळाईने चेंडू स्टंपवर फेकला. त्याने लांबून चेंडू फेकला असला तरी त्याने थेट स्टंपवर चेंडू मारून शिखर धवनला माघारी धाडलं.

पाहा व्हिडीओ-

हेही वाचा: Video: अजब गजब क्लीन बोल्ड... मोईन अलीची विकेट एकदा पाहाच

त्याआधी, दिल्लीने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. कर्णधार रोहित शर्मा चांगल्या लयीत होता पण तो ७ धावांवर बाद झाला. क्विंटन डी कॉक (१९) आणि सूर्यकुमार यादव (३३) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ते दोघे बाद झाले आणि संघाची घडी विस्कटली. सौरभ तिवारी (१५), कायरन पोलार्ड (६), हार्दिक पांड्या (१७), नॅथन कुल्टर नाईल (१), कृणाल पांड्या (१३*) साऱ्यांनीच निराशा केली. अखेरच्या टप्प्यात जयंत यादवने मात्र ४ चेंडूत ११ धावा काढत संघाला १३० धावांपर्यंत पोहोचवले.

loading image
go to top