IPL 2021: पुरस्कार विजेते झाले मालामाल; वाचा कुणाला किती रक्कम? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CSK-Winner

CSK ला स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळाले २० कोटी

IPL: पुरस्कार विजेते झाले मालामाल; वाचा कुणाला किती रक्कम?

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 FINAL मध्ये CSK च्या संघाने KKR ला पराभूत करून विजेतेपदाचा चौकार लगावला. सलामीवीर फाफ डू प्लेसिसच्या तडाखेबाज ८६ धावांच्या खेळीच्या जोरावर CSK ने प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकात ३ बाद १९२ धावांपर्यंत मजल मारली. हे आव्हान KKR च्या फलंदाजांना पार करता आलं नाही. कोलकाताच्या सलामीवीर व्यंकटेश अय्यर (५०) आणि शुबमन गिल (५१) यांनी संघाला भक्कम सलामी दिली होती. पण इतर फलंदाजांनी त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले. त्यामुळे CSK चा २७ धावांनी विजय झाला. चेन्नईने एकूण १० वेळा फायनलमध्ये धडक देत चौथ्यांदा विजेतेपद मिळवलं. जाणून घेऊया हंगामात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पुरस्कार विजेत्यांबद्दल...

हेही वाचा: IPL FINAL: कार्तिकने डू प्लेसिसला दिलेलं जीवदान KKRला पडलं भारी

पुरस्कार विजेते खेळाडू आणि बक्षिसाची रक्कम

 • IPL 2021 विजेते - CSK - २० कोटी रूपये

 • IPL 2021 उपविजेते - KKR - १२.५० कोटी रूपये

 • फायनलचा सामनावीर - फाफ डू प्लेसिस - ५ लाख रूपये

 • सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू - ऋतुराज गायकवाड - १० लाख रूपये

 • हंगामातील सर्वोत्तम झेल - रवि बिश्नोई - १० लाख रूपये

हेही वाचा: "CSK म्हाताऱ्यांचा संघ" म्हणणाऱ्यांना कोचचं सडेतोड उत्तर!

 • हंगामातील सर्वोत्तम 'गेमचेंजर' खेळाडू - हर्षल पटेल - १० लाख रूपये

 • हंगामातील सर्वात मोठा षटकार - रॉबिन उथप्पा - १० लाख रूपये

 • हंगामात पॉवर-प्ले मधील सर्वोत्तम कामगिरी - व्यंकटेश अय्यर - १० लाख रूपये

 • पर्पल कॅप (हंगामातील सर्वाधिक बळी) - हर्षल पटेल - १० लाख रूपये

 • ऑरेंज कॅप (हंगामातील सर्वाधिक धावा) - ऋतुराज गायकवाड - १० लाख रूपये

 • हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडू - हर्षल पटेल - १० लाख रूपये

loading image
go to top