VIDEO : अजिंक्यचा कडक सिक्सर बघाच!

Ajinkya Rahane
Ajinkya RahaneIPL Twitter

IPL 2022, Chennai vs Kolkata, 1st Match : राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स यांच्याकडून खेळल्यानंतर आका अजिंक्य रहाणे कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात सामील झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सलामीच्या लढतीत धावांचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणेनं युवा सलामीवीर व्यंकटेश अय्यरच्या साथीनं संघाच्या डावाला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी अजिंक्य रहाणेवर संकटावर संकटे आली होती. पण सलामीच्या लढतीत त्याने दिमाखदार खेळ करत आपल्यातील धमक दाखवून दिली. रहाणेच अर्धशतक हुकलं असलं तरी त्याने संघासाठी उपयुक्त खेळी केली. त्याने 34 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 44 धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने मारलेला षटकार बघण्याजोगा होता.

खराब कामगिरीमुळे आधी त्याने राष्ट्रीय संघातील स्थान गमावले. त्यानंतर बीसीसीआय करारातील श्रेणीतही त्याची घसरण झाली. एका बाजूला हे सर्व घडत असताना अजिंक्य रहाणे रणजीमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्याने रणजीत दमदार शतकही झळकावले. आता आयपीएलमध्ये त्याला कोलकाता किती सामन्यात खेळवणार? संधी दिली तर तो कशी कामगिरी करणार? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात होता.

कोलकाता संघाने अनुभवी अजिंक्य रहाणेवर भरवसा दाखवत त्याला सलामीवीर म्हणून निवडले. नव्या कर्णधाराने दिलेली नवी संधी त्याने योग्य असल्याचे दाखवून दिले. चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या 132 धावांचा पाठलाग करताना व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणेनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. कोलकाता नाइट रायडर्सच्या डावातील चौथ्या षटकात रहाणेनं मिल्नेला कडक षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. त्याने मारलेला हा फटका बघण्याजोगा असा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com