IPL Closing Ceremony : रणवीरचा गुजराती तडका; रेहमानच्या वंदे मातरमने प्रेक्षक मंत्रमुग्ध

IPL 2022 Closing Ceremony Gujarat Titans vs Rajasthan Royals Final
IPL 2022 Closing Ceremony Gujarat Titans vs Rajasthan Royals Final esakal

अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या हंगामाची (IPL 2022) सांगता आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. फायनल गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या होत आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी समारोप समारंभ (IPL Closing Ceremony) झाला. तब्बल तीन वर्षानंतर आयपीएलचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होते. कोरोना साथरोगामुळे गेली तीन वर्षे अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी होती. मात्र आयपीएल 2022 चा हंगामाचा शेवट धूमधाडाक्यात करण्याचा बीसीसीआयचा मानस होता. या सांगता समारंभासाठी बॉलीवूड स्टार्स आपली कला सादर केली. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि ए.आर. रेहमान (A.R. Rahman) यांनी सांगता समारंभात नृत्याचे आणि गाण्याचे सादरीकरण केले.

रवी शास्त्री यांच्या दमदार आवाजाने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील सांगता समारंभाची सुरूवात झाली. त्यानंतर बॉलीवडूचा सुपरस्टार रणवीर सिंहने मैदानात धावत येत, इंडिया जितेगा म्हणत दमदार एन्ट्री केली. बॉलीवूडचा स्टार अभिनेता अक्षय कुमारने देखील आयपीएलच्या सांगता समारंभाला उपस्थिती लावली. दुसऱ्या बाजूला आमिर खान स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना दिसला. रणवीर सिंहने आपल्या रामलीला चित्रपटातील गाण्यावर थिरकत अहमदाबादच्या प्रेक्षकांना खूष केले.

यानंतर भारताचा दिग्गज संगीत दिग्दर्शन आणि गायक ए. आर. रेहमानच्या वंदे मातरंम गाण्यामुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले. (IPL Closing Ceremony) ए. आर. रेहमानने यानंतर बॉलीवूडमध्ये गायलेल्या गाण्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केले. त्याला मोहित चौहान या गायकानेही चांगली साथ दिली. रेहमानने युवामधील गाणी, सड्डा हक्क, रंग दे बसंती, यासारख्या चित्रपटातील प्रसिद्ध गाणी गायली.

सांगता समारंभाचे क्षणचित्रे 

 ए. आर. रेहमानने वंदे मातरमने केली सुरूवात

ए. आर. रेहमानने स्टेजवर आल्या आल्या वंदे मातरम गाणे म्हणत सर्वांना मंत्रमुग्ध केले.

रणवीरनंतर आता ए. आर. रेहमान प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी मैदानावर

वंदे मातरमने ए. आर. रेहमानने केली सुरूवात.

रणवीर सिंगचा गुजराती तडका

रणवीर सिंहने आपल्या रामलीला चित्रपटातील गाण्यावर थिरकत अहमदाबादच्या प्रेक्षकांना खूष केले.

स्टँडमध्ये अक्षय कुमारची देखील उपस्थिती

बॉलीवूडचा स्टार अभिनेता अक्षय कुमारने देखील आयपीएलच्या सांगता समारंभाला उपस्थिती लावली.

रणवीर सिंगची दमदार एन्ट्री 

बॉलीवडूचा सुपरस्टार रणवीर सिंहने मैदानात धावत येत, इंडिया जितेगा म्हणत दमदार एन्ट्री केली.

दोन्ही कॅप्टन्सचे मैदानात आगमन 

रवी शास्त्री यांच्या कॉमेंटरीने सुरू झाला सांगता समारंभ

रवी शास्त्री यांच्या दमदार आवाजाने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील सांगता समारंभाची सुरूवात झाली.

आमिर खान करतोय अँकरिंग 

स्टार स्पोर्ट्सच्या प्री-मॅचचे अँकरिंग आमिर खान करत आहे.

मैदानावर रणवीर सिंहचे आगमन 

आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या सांगता समारंभाचा होस्ट रणवीर सिंहचे मैदानावर आगमन झाले आहे.

मोदी - अमित शहा उपस्थित राहणार?

आयपीएलच्या सांगता समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या हंगामाची (IPL 2022) सांगता आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. फायनल गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या होत आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी समारोप समारंभ (IPL Closing Ceremony) झाला. तब्बल तीन वर्षानंतर आयपीएलचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होते. कोरोना साथरोगामुळे गेली तीन वर्षे अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी होती. मात्र आयपीएल 2022 चा हंगामाचा शेवट धूमधाडाक्यात करण्याचा बीसीसीआयचा मानस होता. या सांगता समारंभासाठी बॉलीवूड स्टार्स आपली कला सादर केली. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि ए.आर. रेहमान (A.R. Rahman) यांनी सांगता समारंभात नृत्याचे आणि गाण्याचे सादरीकरण केले.

रवी शास्त्री यांच्या दमदार आवाजाने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील सांगता समारंभाची सुरूवात झाली. त्यानंतर बॉलीवडूचा सुपरस्टार रणवीर सिंहने मैदानात धावत येत, इंडिया जितेगा म्हणत दमदार एन्ट्री केली. बॉलीवूडचा स्टार अभिनेता अक्षय कुमारने देखील आयपीएलच्या सांगता समारंभाला उपस्थिती लावली. दुसऱ्या बाजूला आमिर खान स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना दिसला. रणवीर सिंहने आपल्या रामलीला चित्रपटातील गाण्यावर थिरकत अहमदाबादच्या प्रेक्षकांना खूष केले.

यानंतर भारताचा दिग्गज संगीत दिग्दर्शन आणि गायक ए. आर. रेहमानच्या वंदे मातरंम गाण्यामुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले. (IPL Closing Ceremony) ए. आर. रेहमानने यानंतर बॉलीवूडमध्ये गायलेल्या गाण्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केले. त्याला मोहित चौहान या गायकानेही चांगली साथ दिली. रेहमानने युवामधील गाणी, सड्डा हक्क, रंग दे बसंती, यासारख्या चित्रपटातील प्रसिद्ध गाणी गायली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com