DC vs KKR: उमेशमुळे दिल्लीला टेन्शन मात्र पॉवेलने विजय आणला खेचून

IPL 2022 Delhi Capitals vs Kolkata Knight Riders
IPL 2022 Delhi Capitals vs Kolkata Knight Ridersesakal

दिल्ली कॅपिटल्स vs कोलकाता नाईट रायडर्स Highlights 

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सने ठेवलेले 147 धावांचे आव्हान 6 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. दिल्लीकडून रोव्हमन पॉवेलने आक्रमक 33 धावांची खेळी केली. याचबरोबर डेव्हिड वॉर्नरने देखील 42 धावांची खेळी केली. केकेआरकडून उमेश यादवने 3 विकेट घेत दिल्लीला टेन्शन दिले होते. मात्र अखेर दिल्लीने 147 धावांचे आव्हान 19 व्या षटकात पार केले.

 व्पॉयवलेची फटकेबाजी दिल्लीने सामना 19 व्या षटकातच संपवला

अक्षर पटेल बाद झाल्यानंतर पॉवेलने धडाकेबाज फलंदाजी करत दिल्लीला सामना 19 व्या षटकातच जिंकून दिला. त्याने 16 चेंडूत 33 धावा ठोकल्या.

113-6 : अक्षर पटेल धावबाद 

दिल्लीचा निम्मा संघ शंभरच्या आतच माघारी गेल्यानंतर अक्षर पटेलने 17 चेंडूत 24 धावा करत दिल्लीला आधार दिला होता. मात्र त्याला श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यरने धावबाद केले.

84-5 : उमेश यादव ऑन फायर 

उमेश यादवने दिल्लीला चांगलेच हादरे दिले. त्याने दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला अवघ्या दोन धावांवर बाद करत आपली तिसरी शिकार केली. यामुळे दिल्लीची अवस्था 3 बाद 82 धावांवरून 5 बाद 84 धावा अशी झाली.

84-4 : नारायणने केली ललित शिकार

सुनिल नारायणने दिल्लीचा सेट झालेला फलंदाज ललित यादवला 22 धावांवर बाद करत दिल्लीला चौथा धक्का दिला.

82-3 : उमेश यादवने जोडी फोडली

खराब सुरूवातीनंतर दिल्लीच्या डेव्हिड वॉर्नर आणि ललित यादव यांनी डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी रचली. मात्र अखेर उमेश यादवने 42 धावा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला बाद करत ही जोडी फोडली.

17-2 : मिशेल मार्शकडून  निराशा

कोरोनामधून सावरत संघात परतलेल्या मिशेल मार्शने निराशा केली. त्याला हर्षीत राणाने 13 धावांवर बाद केले.

उमेश यादवचा पहिल्याच चेंडूवर दणका

उमेश यादवने दिल्लीला पहिल्याच चेंडूवर धक्का दिला. त्याने सलामीवीर पृथ्वी शॉला डावाच्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद केले.

मुस्तफिजूरने केकेआरचा विषयच संपवला

मुस्तफिजूर रहीमने शेवटच्या षटकात केकेआरचे तीन फलंदाज बाद करत त्यांचे 150 च्या पुढे जाण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. त्याने दुसऱ्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट घेत केकेआरला 146 धावांवर रोखले.

नितीश राणाची झुंजार खेळी

केकेआरचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना नितीश राणाने केकेआरचा डाव सावरला. त्याने अर्धशतकी खेळी करत संघाला 150 च्या जवळ पोहचवले. त्याने रिंकू सिंह याच्याबरोबर अर्धशतकी भागीदारी रचली.

83-6 : कुलदीपचा डबल धमाका 

कुलदीपने 14 व्या षटकात पहिल्याच चेंडूवर श्रेयस अय्यरला बाद केले. त्यानंतर षटकाच्या चौथ्या चेंडूवर कुलदीपने केकेआरला मोठा धक्का दिला. त्याने आंद्रे रसेलला शुन्यावर बाद केले.

83-5 : कर्णधाराची झुंजार इनिंग  संपली

कुलदीप यादवने केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरची 42 धावांची झुंजार खेळी संपवली.

35-4 :कुलदीप यादवचा केकेआरला दणका

सामन्याचे आठवे षटक टकाणाऱ्या कुलदीप यादवने सलग दोन चेंडूवर दोन फलंदाज बाद केले. त्याने दुसऱ्या चेंडूवर बाबा इंद्रजीतला 6 धावांवर तर तिसऱ्या चेंडूवर सुनिल नारायणला शुन्यावर बाद केले. मात्र त्याला हॅट्ट्रिक साधता आली नाही.

22-2 : व्यंकटेश अय्यर पुन्हा फेल

केकेआरचा आक्रमक फलंदाज व्यंकटेश अय्यर पुन्हा एकदा फेल गेला आहे. त्याला अक्षर पटेलने 6 धावांवर बाद केले.

4-1 : फिंच 3 धावांची भर घालून परतला

दिल्लीच्या संघात दोन बदल 

दिल्लीने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. खलील अहमद आणि सर्फराज खान यांच्या जागी मिशेल मार्श आणि चेतन साकरिया यांचा समावेश करण्यात आला आहे. केकेआरने देखील आपल्या संघात तीन बदल केले आहेत. फिंच, हर्षीत राणा आणि इंद्रजीत यांना संघात स्थान देण्यात आले आहे.

दिल्लीने नाणेफेक जिंकली.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com