VIDEO : मॅक्सवेलची जबऱ्या फिल्डिंग; MI च्या स्टारला केलं रन आउट

MI VS RCB
MI VS RCBSakal

IPL 2022 : ऑस्‍ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्‍लेन मॅक्‍सवेलनं (Glenn Maxwell) मुंबई इंडियन्स विरुद्धच्या लढतीतून यंदाच्या हंगामाला सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात त्याने फिल्डिंगवेळी अप्रतिम नजराणा दाखवून दिला. मुंबई इंडियन्सकडून मागच्या काही सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माला (Tilak Verama) त्याने तंबूचा रस्ता दाखवला. त्याने घेतलेली ही विकेट बंगळुरुच्या संघासाठी फायद्याची तर मुंबई इंडियन्स संघाला बॅकफूटवर टाकणारी अशीच होती.

मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) डावातील 10 व्या षटकात इशान किशन झेल बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी तिलक वर्मा क्रिजमध्ये आला. सलग दोन चेंडू निर्धाव गेल्यावर तिलक वर्माने खाते उघडण्यासाठी गडबड केली. तिसऱ्या चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेन ढकलून त्याने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण नॉन स्ट्राइक एन्डला पोहचण्याआधी मॅक्सवेलनं चपळाई दाखवत त्याला तंबूचा रस्ता धरायला भाग पाडले.

MI VS RCB
MI vs RCB : मुंबई चेन्नईच्याच वळणावर; आरसीबीची हॅट्ट्रिक

बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ केवळ दोन परदेशी खेळाडूंसह मैदानात उतरला होता. मुंबईने टायमल मिल्स आणि डॅनियल सॅम्सच्या जागी जयदेव उनादकट आणि रमनदीप सिंग यांना संधी दिली होती. आयपीएलच्या इतिहासात असा प्रयोग करण्याची मुंबईची ही पहिलीच वेळ होती. हा प्रयोग फार यशस्वी ठरला नाही. मुंबई सूर्यकुमार यादव वगळता अन्य स्टार खेळाडूंचा फ्लॉप शोमुळे संघाला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

MI VS RCB
गल्ली क्रिकेट खेळा IPL सामन्याचे फ्री तिकीट मिळवा! जाणून घ्या स्कीम

आयपीएलच्या इतिहासात विक्रमी पाच वेळा जेतेपद मिळवणारा संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. कर्णधार रोहित शर्मा नावाला साजेसा खेळ करताना दिसत नाही. त्याच्याशिवाय पोलार्डच्या भात्यातूनही फटकेबाजी होत नाही. गोलंदाजीमध्ये बुमराहही नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला आहे. रिटेन केलेल्या या स्टार फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com