IPL Record : हार्दिक पांड्याच्या फिफ्टीत विक्रमी 'शतकी' तडका

IPL 2022 Hardik Pandya Record
IPL 2022 Hardik Pandya Record Sakal

सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. भुवी, मोर्को आणि टी नटराजन यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर टॉस जिंकून गोलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सला 162 धावांत रोखले. केन विल्यमसनचे ( Kane Williamson) अर्धशतक आणि त्याला सलामीवीर अभिषेक शर्माने (Abhishek Sharma)दिलेली साथ याच्या जोरावर संघाने 8 विकेट्स राखून दिमाखदार विजय नोंदवला. गजरातच्या पदरी आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) संघाने स्पर्धेत पहिल्या पराभवाचा सामना केला असला तरी कॅप्टनच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली आहे.

IPL 2022 Hardik Pandya Record
GT vs SRH : गुजरातची विजयी घोडदौड हैदराबादच्या नवाबांनी थांबवली

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) जलद शंभर सिक्सर पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलाय. आयपीएलच्या इतिहासात षटकारांचे सर्वात जलद शतक पूर्ण करण्याचा विक्रम हा कॅरेबियन स्टार आणि स्फोटक क्रिकेटर ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावे आहे. त्याने 657 चेंडूंचा सामना करताना हा पराक्रम करुन दाखवला होता. त्याच्या पाठोपाठ या यादीत आंद्रे रसेलचा (Andre Russell) नंबर लागतो. रसेलनं 943 चेंडूचा सामना केल्यावर शंभर षटकार खेचले होते. हार्दिक पांड्याने षटकारांचे शतक साजरे करण्यासाठी 1046 चेंडू खेळले. सर्वात जलद हा टप्पा पार करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.

IPL 2022 Hardik Pandya Record
KKR च्या Mystery Girl ची ओळख पटली; कोण आहे माहितीये का?

संघ अडचणीत असताना हार्दिक पांड्याने हैदराबाद विरुद्ध अर्धशतकी खेळी केली. आयपीएलमधील 17 डावानंतर त्याच्या भात्यातून अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली. याआधी 2020 मध्ये झालेल्या आयपीएलच्या 13 व्या हंगामात हार्दिक पांड्याने शेवटचे अर्धशतक झळकावले होते. राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने 21 चेंडूत 60 धावांची खेळी केली होती. गत हंगामात त्याला नावाला साजेसा खेळ करता आला नव्हता. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थिती करण्यात आले होते. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने 42 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावांची नाबाद खेळी केली. भात्यातील फटकेबाजी आणि गोलंदाजीसाठी तंदुरुस्त असल्याचे दाखवून देत आता तो पुन्हा एकदा टीम इंडियातील आपली दावेदारी भक्कम करताना दिसतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com