VIDEO : भर मैदानात जॉन्टी ऱ्होड्सनं धरले सचिन तेंडुलकरचे पाय

MI vs PBKS
MI vs PBKSSakal

आयपीएल 2022 च्या हंगामात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ संघर्षाचा सामना करताना दिसतोय. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. पुण्याच्या मैदानातील सामन्यातील मुंबई इंडियन्सच्या पराभवाशिवाय आणखी एक गोष्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हिटमॅन रोहितपासून ते क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि महेला जयवर्धने सारखे दिग्गज डग आउटमध्ये होते. पण संघाला खास कामगिरी करता आली नाही.

MI vs PBKS
IPL 2022 : ...तर MI यंदाही Playoffs मध्ये खेळेल? हा घ्या पुरावा

पंजाबक किंग्जकडून मुंबई इंडियन्सला 12 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर पंजाब किंग्जच्या ताफ्यातील दिग्गज आणि संघाचा फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्स (Jonty Rhodes) याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भेटायला आला. आदराने त्याने खाली वाकून सचिनचे पाय धरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सचिन तेंडुलकरने त्याला अडवत गळाभेट घेतली. या सीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

MI vs PBKS
आठ कोटींचा गडी बाकावर; MI कसं जिंकणार? जाफरचा टोला

जॉन्टी ऱ्होड्स हा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फिल्डर्सपैकी एक आहे. त्याने आपली कारकिर्द जबरदस्त फिल्डिंगच्या जोरावर गाजवली आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने अनेक अफलातून कॅच घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. पंजाब किंग्जच्या ताफ्यात सामील होण्यापूर्वी जोन्टी मुंबई इंडियन्स संघाचाही सदस्य राहिला आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर आणि यांच्यात खास बॉन्डिंग आहे. त्याची झलक पुण्यातील मैदानात अनुभवायला मिळाली.

मुंबई इंडियन्सच्या संघाला 2014 नंतर पुन्हा एकदा सलग पाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएलच्या इतिहासात विक्रमी पाच जेतेपद मिळवणारी मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा एका हंगामात सलग पाच वेळा पराभूत होणारी टीमही ठरलीये. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवून प्ले ऑफ्समध्ये खेळण्यासाठी आता यापूढचा प्रत्येक सामना त्यांना जिंकावा लागणार आहे. यापूर्वीचा करिष्मा पुन्हा एकदा दाखवून देत संघ दमदार कमबॅक करणार का? मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना 2014 ची पुनरावृत्तीची अनुभूती येणार का? हे पाहणे खूपच रंजक ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com