IPL 2022 : DC नं स्पायडरमॅन पंतसह शेअर केला जादुगाराचा खास फोटो

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे.
ipl 2022 | kkr vs dc
ipl 2022 | kkr vs dc sakal

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवर एक खास फोटो शेअर केलाय. या फोटोत दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत स्पायडर मॅनच्या लूकमध्ये दिसतोय तर दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यरला 'द मॅजेशियन'च्या रुपात दाखवण्यात आले आहे. या फोटोतील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ब्रेबॉर्न स्टेडियमला त्यांनी थियटर संबोधल्याचे दिसते. हॉलिवूडचा दाखला देत दिल्ली कॅपिटल्सने दोन्ही संघातील फाईट ही एक अगळी वेगळी पर्वणी असेल, असे म्हटले आहे. (IPL 2022 Today Match)

आयपीएलमध्ये पंतच्या आधी श्रेयस अय्यरच दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन होता. तो दुखापतीमुळे संघाबाहे गेला आणि पंतकडे नेतृत्वाची जबाबदारी आली. श्रेयय अय्यर दुखापतीतून सावरुन परतल्यानंतरही फेंचायझीनं पंतकडे कर्णधारपद कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या हंगामात श्रेयस अय्यरला त्यांनी रिलीजही केले. ज्यावेळी तो रिलीज झाला त्यावेळीच तो एखाद्या फ्रेंचायझीचा कॅप्टन होणार याची चर्चा सुरु झाली. आणि झालेही तसेच. कोलकाता संघाने त्याच्यावर विश्वास टाकला. आयपीएलमध्ये एकमेकांच्या नेतृत्वाखाली खेळलेले हे दोन भारतीय युवा स्टार एकमेकांसमोर कशी कामगिरी करुन दाखवणार हे पाहणे रंजक असेल.

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 29 सामने खेळले गेले आसून ज्यामध्ये केकेआरने 16 जिंकले, तर दिल्लीने 14 जिंकले आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला. या हंगामात केकेआर मजबूत स्थितीत दिसत आहे. या संघाने 4 पैकी फक्त 1 सामना गमावला आहे, तर दिल्लीला 3 पैकी फक्त 1 सामना जिंकता आला आहे. दिल्ली लीगमध्ये परतण्याचा प्रयत्न करेल. KKR सध्या गुणतालिकेत अव्वल आहे, तर दिल्ली सातव्या स्थानावर आहे.

ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे दोघेही भारतीय संघाचे भावी कर्णधार म्हणून ओळखले जात आहे. या सामन्यात दोघेही कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ऋषभ पंतला थोडे दडपण जाणवत असेल कारण त्याच्या संघाने आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे.(KKR vs DC Today Match)

कोलकाता नाइट रायडर्स संघ :

श्रेयस अय्यर (कप्तान), शेल्डन जैक्सन (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, सैम बिलिंग्स, आंद्रे रसेल, सुनील नरेन, उमेश यादव, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, बाबा इंद्रजीत, रिंकू सिंह, अनुकुल रॉय, प्रथम सिंह, अभिजीत तोमर, रसिख सलाम, अमन हकीम खान, अशोक शर्मा, रमेश कुमार.

दिल्ली कॅपिटल्स संघ :

रिषभ पंत (कप्तान/विकेटकीपर), अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्त्जे, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, मुस्तफिजुर रहमान, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अश्विन हैब्बर, सरफराज खान, कमलेश नागरकोटी, श्रीकर भरत, मंदीप सिंह, खलील अहमद, चेतन साकरिया, ललित यादव, रिपल पटेल, यश ढुल, रोमैन पॉवेल, प्रवीण दुबे, लुंगी नगिडी, टिम सेफर्ट, विकी ओस्तवाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com