अजिंक्यचं करियरच संपलं? आता KKR नं बसवलं बाकावर

Ajinkya Rahane
Ajinkya RahaneSakal

कधी काळी भारतीय संघाकडून तीन क्रिकेट प्रकारात खेळणारा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आता संघाबाहेर आहे. टीम इंडियाच्या टी 20 आणि वनडे संघातून स्थान गमावलेल्या अजिंक्य रहाणेला कसोटी क्रिकेटमधूनही डच्चू मिळाला आहे. आता आयपीएलमध्येही (IPL) त्याला मोठा दणका बसलाय. आयपीएल स्पर्धेतील सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघानेही (Kolkata Knight Riders) त्याला बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला. सातत्याने धावा करण्यात तो अपयशी ठरत असल्यामुळे त्याच्यावर आता आयपीएलमध्येही प्लेइंग इलेव्हनमधील स्थान धोक्यात आले आहे.

Ajinkya Rahane
KKR vs SRH : अनोख्या विक्रमी सामन्यात फिंचचा फ्लॉप शो!

टीम इंडियातून (Indian Cricket Team) स्थान गमावलेल्य अजिंक्य रहाणेवर मेगा लिवात कोलकाताने डाव खेळला. त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं. एवढंच नाही तर संघाच्या डावाची सुरुवात करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारीही त्याच्यावर सोपवली. पण तो आपल्या नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना पाच सामन्यात तो फ्लॉप ठरला. त्याच्या जागेवर एरोन फिंचला संधी देण्यात आली. तोही फार कमाल करु शकला नसला तरी आता अजिंक्य रहाणेचा मार्ग आणखी खडतर झाल्याचे संकेत मिळाले आहेत.

Ajinkya Rahane
IPL च्या बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव; दिल्लीच्या ताफ्यात खळबळ

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणेनं बऱ्यापैकी धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्याने 34 चेंडूत में 44 धावांची खेळी केली. त्यानंतर त्याची कामगिरी पुन्हा ढासळली. चार सामन्यात त्याची 12 ही सर्वोच्च धावसंख्या राहिली. दुसऱ्या मॅचमध्ये 10 चेंडूत 9 धावा, तिसऱ्या सामन्यात 11 चेंडूत 12 धावा, चौथ्या सामन्यात 11 चेंडूत 7 धावा आणि पाचव्या सामन्यात त्याने 14 चेंडूत 8 धावा केल्या. परिणामी कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला. सातत्यातील अभावामुळे टीम इंडियातील स्थान गमावून बसलेल्या अजिंक्य रहाणेवर आता फ्रेंचायझी क्रिकेटमध्येही टांगती तलावर असल्याचे दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com