
नव्या संघांची भरारी जूने मात्र तळाशी; काय सांगतो IPLचा पॉईंट टेबल
IPL-2022 मध्ये 9 एप्रिल रोजी 2 सामने खेळले गेले. पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जवर 8 गडी राखून विजय मिळवला , तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 7 गडी राखून पराभव केला. या हंगामात आतापर्यंत 18 सामने खेळले गेले आहेत. मुंबईवरील विजयानंतर आरसीबीने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी स्थिती आहे.(IPL 2022 Points Table Update)

कोलकाता नाईट रायडर्स 4 पैकी 3 विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर गुजरात टायटन्सने विजयाची हॅट्ट्रिकसह दुसरे स्थान मिळविले आहे. दुसरीकडे, तीन सामने जिंकून आरसीबी तिसऱ्या तर लखनऊ सुपर जायंट्स चौथ्या स्थानावर आहे. अव्वल-4 संघांनी 3-3 सामने जिंकले आहेत, परंतु धावगतीमुळे ते एकमेकांच्या तळाशी आहेत.
मुंबई आणि चेन्नईची अवस्था वाईट
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज 2-2 सामने जिंकून अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. खालच्या क्रमवारीबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली कॅपिटल्स सातव्या स्थानावर आहे, तर हैदराबादने विजयाचे खाते उघडून आठव्या स्थानावर पोहोचले आहे. चारही सामने गमावून मुंबई आणि चेन्नई तळाला आहेत.
ऑरेंज कॅप -

पर्पल कॅप -

Web Title: Ipl 2022 Points Table Update Orange Cap Purple Cap After Rcb Vs Mi Match
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..