RR vs KKR : केकेआरचा 'करारा जवाब', सरशी मात्र राजस्थानचीच

IPL 2022 Rajasthan Royals Defeat Kolkata Knight Riders
IPL 2022 Rajasthan Royals Defeat Kolkata Knight Ridersesakal

मुंबई : ब्रेबॉर्नवर झालेल्या हाय स्कोरिंग सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने राजस्थानचे 217 धावांचे अवाढव्य आव्हान पार करण्यासाठी जीवाचे राण केले. अखेर त्याच्या झुंजार वृत्तीवर उमेश यादव यशाची मोहर उमटवणार असे वाटत होते. मात्र राजस्थानच्या मॅकॉयने अखेरच्या षटकात विजयासाठी 11 धावांची गरज असताना फक्त 3 धावा देत दोन विकेट घेतल्या आणि सामना संपवला. राजस्थानने सामना 8 धावांनी जिंकला. (Rajasthan Royals Defeat Kolkata Knight Riders in High Scoring Match Yuzvendra Chahal Shine)

राजस्थानच्या 218 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या केकेआरला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. सलामीला आलेला सुनिल नारायण धावबाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यर आणि अॅरोन फिंच यांनी धडाकेबाज फलंदजी करण्यास सुरुवात केली. या दोघांनी नव्या षटकाताच संघाचे शतक धावफलकावर लावले. फिंचने 24 चेंडूत 58 धावांची धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली.

फिंच बाद झाल्यानंतर डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. मात्र दुसऱ्या बाजूने राजस्थानचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आपल्या फिरकीत केकेआरचे एक एक करून फलंदाज अडकवायला सुरुवात केली. चहलने केकेआरची अवस्था 3 बाद 148 वरून 8 बाद180 धावा अशी केली. त्याने 40 धावात 5 बळी टिपले.

एका बाजूने विकेट पडत असताना, केकेआरची अवस्था 8 बाद 180 झाली असताना उमेश यादव आणि शेल्डन जॅक्सन यांनी झुंजार वृत्ती दाखवली. उमेश यादवने 18 वे षटक टाकणाऱ्या बोल्टला दोन षटकार आणि एक चौकार मारत 20 धावा चोपून काढल्या. यानंतर राजस्थान सामना आरामात जिंकरणार असे वाटत होते. मात्र उमेश यादवने 9 चेंडूत 21धावांची आतशबाजी केली अन् सामन्यात रंगत आली. मात्र अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना मॅकॉयने 3 धावात 2 बळी घेत केकेआरचा डाव 210 धावांवर संपवला.

कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम राजस्थान रॉयल्सला फलंदाजीला पाचारण केले. राजस्थानला सलामीवीर जॉस बटलर आणि देवदत्त पडिक्कल यांनी तुफानी सुरुवात करून दिली. या सलामी जोडीने पॉवर प्लेमध्येच 60 धावांपर्यंत मजल मारली. यात बटलरच्या 46 धावांचा वाटा होता.

जॉस बटलरने एकहाती फलंदाजी करत संघाचे शतक दहाव्या षटकात धावफलकावर लावले. दरम्यान, 24 धावा करणारा पडिक्कल बाद झाला. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसनने बटलरला आक्रमक फलंदाजी करत चांगली साथ दिली. हे दोघे फलंदाजी करत असताना राजस्थान 250 चा टप्पा पार करतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या दोघांनी 15 व्या षटकात राजस्थानला 164 धावांपर्यंत पोहचवले होते.

मात्र सॅमसन 38 धावा करून बाद झाला. त्यानंतर बटलरने हंगामातील दुसरे शतक पूर्ण केले. मात्र शतकानंतर तोही बाद झाला. त्यामुळे राजस्थानची धावगती मंदावली. दरम्यान, नायर आणि रियान बाद झाल्यानंतर शिमरोन हेटमायरने 26 धावांची आक्रमक खेळी करत राजस्थानला 217 धावांपर्यंत पोहचवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com