RR vs KKR :जोमातली केकेआर कोमात; चहलचा कहर

IPL 2022 Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders
IPL 2022 Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders ESAKAL

 मॅकॉयने केकेआरच्या आशेवर फिरवले पाणी 

केकेआरला अखेरच्या षटकात विजयासाठी 11 धावांची गरज असताना मॅकॉयने शेल्डल जॅक्सन आणि 7 चेंडूत 21 धावा करणाऱ्या उमेश यादवला बाद करत सामना 8 धावांनी जिंकून दिला. राजस्थानचा डाव 210 धावात संपुष्टात आला.

उमेश यादवने बॉलिंगची कसर बॅटिंगमध्ये भरून काढली

एका बाजूने विकेट पडत असताना, केकेआरची अवस्था 8 बाद 180 झाली असताना उमेश यादव आणि शेल्डन जॅक्सन यांनी झुंजार वृत्ती दाखवली. उमेश यादवने 18 वे षटक टाकणाऱ्या बोल्टला दोन षटकार आणि एक चौकार मारत 20 धावा चोपून काढल्या.

युझवेंद्र चहलचा जादुई स्पेल

युझवेंद्र चहलने धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या केकेआरला पाठोपाठ धक्के दिले. त्याने आपल्या 4 षटकात 40 धावा देत 5 विकेट घेतल्या. त्याने श्रेयस अय्यर (85), नितीश राणा (18), व्यंकटेश अय्यर(6), शिवम मावी (0) आणि पॅट कमिन्सला (0) बाद केले.

कॅप्टन अय्यर आणि फिंचने केली आरआरची धुलाई

पहिल्याच चेंडूवर विकेट गेल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या अॅरोन फिंच आणि श्रेयस अय्यरने धडाकेबाज फलंदाजी केली. या दोघांनी 9 व्या षटकातच केकेआरचे शतक धावफलकावर लावले.

0-1 : डावाच्या पहिल्याच चेंडूवर केकेआरचा पहिला बळी

राजस्थानच्या 218 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या केकेआरला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. सलामीला आलेला सुनिल नारायण धावबाद झाला.

217-5 (20 Ov) : हेटमायरचा कॅमियो 

शिमरोन हेटमायरने 2 षटकार आणि 2 चौकार मारत 13 चेंडूत 26 धावा चोपल्या. त्यामुळे राजस्थानने 217 धावांचा पल्ला गाठला.

198-5 : संधी मिळालेला करूण नायर 3 धावा करून माघारी 

189-4 : रियान परागकडून पुन्हा निराशा

183-3 : अखेर पॅट कमिन्सने बटलरला केले बाद

पॅट कमिन्सने अखेर जॉस बटलरची 61 चेंडूत 103 धावांची केलेली खेळी संपवली.

बटलरचे हंगामातील दुसरे शतक

केकेआर विरूद्ध सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्र्यात फलंदाजी करणाऱ्या जोस बटलरने यंदाच्या हंगामातील आपले दुसरे शतक ठोकले.

164-2 : संजू सॅमसनची तुफानी खेळी रसेलने संपवली

पडिक्कल 10 व्या षटकात बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याने 19 चेंडूत 38 धावा चोपल्या. यामुळे 15 व्या षटकाच्या आतच राजस्थानने दीडशतकी मजल मारली. मात्र आंद्रे रसेलने संजूची ही तुफानी खेळी 16 व्या षटकात संपवली.

97-1 : अखेर केकेआरला पहिली विकेट मिळाली

सुनिल नारायणने अखेर केकेआरला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने 18 चेंडूत 24 धावा करणाऱ्या पडिक्कलला बाद केले.

बटलरची फिफ्टी; राजस्तान सुसाट

RR 60/0 (6) : राजस्थानची धडाकेबाज सुरूवात

राजस्थानचे सलामीवीर जॉस बटलर आणि देवदत्त पडिक्कलने दमदार सुरुवात केली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये 60 धावा केल्या. यात एकट्या बटलरचा 46 धावांचा वाटा होता.

राजस्थानच्या संघात तब्बल 3 तर केकेआरच्या संघात एकच बदल

राजस्थान रॉयल्सचने आजच्या सामन्यासाठी आपल्या संघात तीन बदल केले आहेत. करूण नायर, ट्रेंट बोल्ट आणि ओब्ड मॅकॉय यांना संघात स्थान मिळाले आहे. तर केकेआरने शिवम मावीला संधी दिली आहे.

कोलकात्याने नाणेफेक जिंकली

केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थान vs कोलकाता दोघांचीही सहावर अडकली आहे गाडी

मुंबई : ब्रेबॉर्नवर झालेल्या हाय स्कोरिंग सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने राजस्थानचे 217 धावांचे अवाढव्य आव्हान पार करण्यासाठी जीवाचे राण केले. अखेर त्याच्या झुंजार वृत्तीवर उमेश यादव यशाची मोहर उमटवणार असे वाटत होते. मात्र राजस्थानच्या मॅकॉयने अखेरच्या षटकात विजयासाठी 11 धावांची गरज असताना फक्त 3 धावा देत दोन विकेट घेतल्या आणि सामना संपवला. राजस्थानने सामना 8 धावांनी जिंकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com