MI vs RR : कर्णधाराच्या बर्थडेलाच मुंबईचा 'सूर्य' तळपला| IPL 2022 Rajasthan Royals vs Mumbai Indians | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 Rajasthan Royals vs Mumbai Indians

MI vs RR : कर्णधाराच्या बर्थडेलाच मुंबईचा 'सूर्य' तळपला Highlights

मुंबई : अखेर मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात विजयाचा मुहूर्त निवडलाच. तोही आपला कर्णधार रोहित शर्माच्या वाढदिवसाचा. मुंबईने राजस्थानचे 159 धावंचे आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात 19.2 षटकातच पार केले. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने अर्धशतकी (51) खेळी केली. त्याला तिलक वर्माने 35 धावा करून चांगली साथ दिली. त्यानंतर शेवटच्या काही षटकात सामना रोमहर्षक स्थितीत पोहचला होता त्यावेळी टीम डेव्हिडने 20 धावांची आक्रमक खेळी करून मुंबईचा विजय निश्चित केला. राजस्थान कडून जॉस बटलरने दमदार फलंदाजी करत 67 धावांची खेळी केली. मुंंबईकडून शोकीन, मॅरेडिथने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

पाहा हायलाईट्स

टीम डेव्हिडची फटकेबाजी; बॉल टू रन सामना जिंकून दिला. 

मुंबईच्या पाठोपाठ दोन विकेट गेल्याने टेन्शन वाढले होते. मात्र टीम डेव्हिडने आक्रमक फटकेबाजी करत सामना 12 चेंडूत 12 धावा असा आणला. त्यानंतर त्याने केलेल्या 20 धावांच्या जोरावर मुंबईने 159 धावांंचे आव्हान 19.2 षटकात पूर्ण केले.

122-4 : प्रसिद्धने मुंबईला दिला चौथा धक्का

तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी रचण्यात महत्वाची भुमिका बजावणारा तिलक वर्मा सूर्यकुमार बाद झाल्यानंतर लगेचच बाद झाला. त्याला प्रसिद्ध कृष्णाने 35 धावांवर बाद केले.

122-3 : चहलने मुंबईला दिला मोठा धक्का

युझवेंद्र चहलने अर्धशतकी खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला अर्धशतकानंतर लगेच बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला.

सूर्यकुमारचे अर्धशतक, मुंबईचा डाव सावरला

सूर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकत मुंबईचा डाव सावरला. त्याने तिलक वर्मा सोबत अर्धशतकी भागीदारी करत 13 व्या षटकात संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले.

41-2 : बोल्टने दिला दुसरा धक्का

ट्रेंट बोल्टने आपल्या जुन्या फ्रेंचायजीला धक्का देण्यास सुरूवात केली. त्याने इशान किशनला 23 धावांवर बाद करत मुंबईचा दुसरा सलामीवीर माघारी धाडला.

23-1 मुंबईला पहिला धक्का

आर अश्विनने मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. त्याने रोहित शर्माला 2 धावांवर बाद केले.

RR 158/6 (20) : मॅरेडिथने अखेरच्या षटकात आवळले

डावाचे शेवटचे षटक टाकणाऱ्या रिले मॅरेडिथने अवघ्या 3 धावा देत 1 विकेट घेतली. यामुळे राजस्थानचा डाव 20 षटकात 6 बाद 158 धावांवर संपला.

130-5 : रियान पराग स्वस्तात माघारी

गेल्या सामन्यातील हिरो रियान परागला मेरेडिथने अवघ्या 3 धावांवर बाद करत राजस्थानला 18 व्या षटकात पाचवा धक्का दिला.

126-4 : शौकीनने संपवली बटलरची आक्रमक खेळी

एका बाजूने राजस्थानच्या विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने जॉस बटलरने डाव सावरत राजस्थानला 126 धावांपर्यंत पोहचवले. मात्र 16 व्या षटकात ऋतिक शौकीन जॉस बटलरची 52 चेंडूत केलेली 67 धावांची खेळी संपवली. विशेष म्हणजे शौकीनला बटलरने पहिल्या चार चेंडूवर चार षटकार मारले होते. मात्र शौकीनने त्याला सहाव्या चेंडूवर बाद करत बदला घेतला.

91-3 : डॅनियलने घेतली डॅरेलची विकेट 

डॅनियल सॅम्सने राजस्थानच्या डॅरेल मिचेलला 17 धावांवर बाद करत राजस्थानला तिसरा धक्का दिला.

54-2 :आक्रमक संजू लगेच परतला. 

संजू सॅमसनने 7 चेंडूत 16 धावा करून आक्रमक सुरूवात केली. मात्र या सुरूवातीचा शेवट कुमार कार्तिकेयने केली.

26-1 : राजस्थानला पहिला धक्का

ऋतिक शोकीनने राजस्थानचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलला 15 धावांवर बाद केले.

मुंबईचा गोलंदाजीचा निर्णय 

मुंबईने गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने आपल्या संघात दोन बदल केले आहेत तर राजस्थानने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.

Web Title: Ipl 2022 Rajasthan Royals Vs Mumbai Indians 44th Match Live Cricket Score Highlights

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top