RCB vs LSG : ड्युप्लेसिसने रचलेल्या पायावर हेडवलूडने चढवला कळस

IPL 2022 Royal Challengers Bangalore Defeat Lucknow Super Giants
IPL 2022 Royal Challengers Bangalore Defeat Lucknow Super Giantsesakal

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामात आज 31 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने लखनौ सुपर जायंटचा 18 धावांनी पराभव केला. याचबरोबर आरसीबीने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. फाफ ड्युप्लेसिसच्या 96 धावांच्या जोरावर आरसीबीने लखनौसमोर 182 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र लखनौला 20 षटकात 8 बाद 163 धावांपर्यंतच मजल मारता आली. आरसीबीकडून जॉश हेडलवूडने प्रभावी मारा करत 25 धावात 4 विकेट घेतल्या. लखनौकडून क्रुणला पांड्याने सर्वाधिक 42 धावा केल्या. (IPL 2022 Royal Challengers Bangalore Defeat Lucknow Super Giants)

आरसीबीचे 182 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या लखनौची सुरुवात देखील चांगली झाली नाही. त्यांनी पॉवर प्लेमध्ये क्विंटन डिकॉक (3) आणि मनिष पांडे (6) हे दोन मोहरे गमावले. दोघांनाही जॉस हेडलवूडने बाद केले. यानंतर कर्णधार केएल राहुलने क्रुणाल पांड्याच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र हर्षल पटेलने त्याला 30 धावांवर बाद करत मोठा धक्का दिला.

क्रुणालने राहुल बाद झाल्यावर आलेल्या दीपक हुड्डासोबत भागीदारी रचत संघाला शंभरी गाठून दिली. मात्र सिराजने हुड्डाला 13 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर एकाकी झुंज देणारा पांड्या देखील 42 धावांवर बाद झाला. त्याचा अडसर मॅक्सवेलने दूर केला. यानंतर आयुष बदोनी आणि मार्कस स्टॉयनिस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा मात्र हेजवलूडने पुन्हा एकदा दणका देत बदोनीला 13 धावांवर बाद केले.

त्यानंतर मार्कस स्टॉयनिसने 15 चेंडूत 24 धावा चोपल्या मात्र मोक्याच्या क्षणी त्याची हेजलवूडने शिकार केली आणि सामना आरसीबीकडे झुकवला. दरम्यान, होल्डरनेही शेवटच्या षटकात दोन षटकार मारत सामन्यात रंगत आणली मात्र हर्षल पटेलने च्याही धडपड थांबवत सामना 18 धावांनी जिंकून दिला.

आयपीएलच्या 31 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंटने नाणेफेक जिंकून प्रथम आरसीबीला फलंदाजीसाठी पाचारण केले. मात्र चमिरा टाकत असलेल्या पहिल्याच षटकात आरसीबीने अनुज रावत आणि विराट कोहली हे दोन मोहरे गमावले. आरसीबीला या दोन धक्क्यातून कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने सावरण्याचा प्रयत्न केला.

त्याने मॅक्सवेलसोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र क्रुणाल पांड्याने मॅक्सवेलला 23 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर ड्युप्लेसिसने पॉवर प्ले संपल्या संपल्या आपली धावांची गती वाढवण्यास सुरुवात केली. मात्र तोपर्यंत दुसऱ्या बाजूने सुयश प्रभुदेसाई (10) बाद झाला. त्यानंतर आलेल्या शाहबाज अहमदने सेट झालेल्या फाफला चांगली साथ देण्यास सुरूवात केली. या दोघांनी आरसीबीला 15 षटकात 132 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, ड्युप्लेसिसने आपले अर्धशतकही पूर्ण केले. मात्र शाहबाज 26 धावा करून बाद झाला.

शाहबाज बाद झाल्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिक आणि ड्युप्लेसिसने आक्रमक फटकेबाजी करत संघाला 180 चा टप्पा पार करून दिला. दरम्यान, ड्युप्लेसिस आपल्या शतकाच्या उंबरठ्यावर उभा होता. मात्र शेवटच्या षटकात तो 96 धावांवर बाद झाला. अखेर आरसीबीचा डाव 20 षटकात 5 बाद 181 धावांवर संपला. कार्तिकने 8 चेंडूत नाबाद 13 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com