IPL 2022 : आयपीएलचा मेगा लिलाव जानेवारीमध्ये

चार राखीव खेळाडूंची नावे कळविण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत
Indian Premier League (IPL) bid verification process for adding two new teams. File
Indian Premier League (IPL) bid verification process for adding two new teams. File sakal media

नवी दिल्ली : ‘इंडियन प्रीमियर लीग’ म्हणजेच आयपीएलच्या १५ व्या सत्राचा मेगा लिलाव पुढील वर्षाच्या पूर्वसंध्येला जानेवारी महिन्यात पार पडणार आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल (जेसी) सदस्याच्या मते, ही मेगा-लिलाव प्रक्रिया जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल. त्यामुळे सर्व जुन्या आठ आयपीएल संघांना डिसेंबरपर्यंत कायम ठेवलेल्या खेळाडूंची (रिटेन) यादी अंतिम करण्यास सांगितले जाईल.

Indian Premier League (IPL) bid verification process for adding two new teams. File
T20 World Cup 2021 : भारतासाठी अस्तित्वाची लढाई

‘‘पुढील सात-आठ दिवसांत १५ हंगामाच्या सर्व तारखा निश्चित केल्या जातील. राखीव ठेवलेल्या खेळाडूंचे नियम आणि इतर गोष्टींबद्दल आम्ही फ्रँचायजींशी आधीच अनौपचारिकपणे बोललो आहोत. राखीव ठेवलेले खेळाडू कळवण्याची अंतिम मुदत, लिलाव पर्स आणि लिलावाच्या तारखा पुढील काही दिवसांत ठरवून फ्रँचायजींना औपचारिकपणे त्याबद्दल कळवले जाईल,’’ असेही आयपीएल जीसी सदस्‍याने म्हटले आहे.

नवीन फ्रँचायजींना प्रत्यक्ष लिलाव सुरू होण्यापूर्वीच लिलाव पूलमधून तीन खेळाडू निवडण्याचा अधिकार असेल. जुन्या फ्रँचायजींना त्यांचे चार खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी दिली जाणार असल्याने नवीन फ्रँचायजींचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे नव्या अहमदाबाद आणि पुणे या दोन्ही फ्रँचायजींना विद्यमान फ्रँचायजींच्या बरोबरीने आणण्यासाठी, बीसीसीआय दोन्ही फ्रँचायजींना मेगा लिलाव सुरू होण्यापूर्वी लिलाव पूलमधून प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्याची परवानगी देण्याबाबत विचार करत आहे.

Indian Premier League (IPL) bid verification process for adding two new teams. File
खेलंदाजी ; खेळात धर्म नकोच...

‘‘हा एक प्रस्ताव आहे आणि आम्ही या विषयावर चर्चा केली आहे, परंतु ते अद्याप अंतिम नाही. अजून बऱ्याच गोष्टींवर काम व्हायचे आहे. पहिल्यापासून सर्व गोष्टींची सुरुवात होणार असल्याने दोन नवीन संघांसाठी खेळाचे मैदान समतल करण्याबाबत चर्चा झाली. आरटीएम (संघातील जुना खेळाडू रिटेन ठेवण्यासाठीच्या बोलीचा नियम) बाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल,’’ असे या सदस्‍याने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com