शर्यतीतून 2 संघ बाहेर! आता 7 संघांमध्ये अडकला पेच; संघांचे प्लेऑफ समीकरण पुन्हा बिघडले | IPL 2023 Playoff Scenario Points Table Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2023 PlayOff Scenario and Points Table

IPL 2023 Playoff Scenario : शर्यतीतून 2 संघ बाहेर! आता 7 संघांमध्ये अडकला पेच; संघांचे प्लेऑफ समीकरण पुन्हा बिघडले

IPL 2023 PlayOff Scenario and Points Table : आयपीएल 2023 प्लेऑफची शर्यत दिवसेंदिवस रंजक होत आहे. आयपीएल 2023 चा 62 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने 34 धावांनी विजय मिळवला आणि प्लेऑफचे तिकीट बुक केले. यासोबतच दिल्ली आणि हैदराबाद या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. मात्र गुजरात प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर अनेक संघांचे समीकरण बिघडले आहे.

चेन्नई सुपर किंग्सचे 13 सामन्यांत 7 विजय आणि 4 पराभवानंतर 15 गुण आहेत. या संघाचा एक सामना पावसामुळे रद्दही झाला होता. सीएसके सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढील सामन्यातील विजयासह सीएसके किमान प्लेऑफमध्ये आपला मार्ग निश्चित करू शकेल. पण लखनऊ आणि मुंबईच्या संघांना आता टॉप-2 मध्ये जाण्याची मोठी संधी आहे. आणि हे शक्य आहे की सीएसके संघ क्वालिफायरऐवजी एलिमिनेटर सामना खेळेल.

मुंबई संघाचे 12 सामन्यांत 14 गुण आहेत आणि सध्या हा संघ गुणतालिकेत तिसर्‍या क्रमांकावर आहे. मुंबईचा संघ पुढचा सामना जिंकला तर थेट दुसऱ्या क्रमांकावर जाईल. दुसरीकडे सीएसकेचा संघ पुढचा सामना हरला, तर पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचणे त्यांना अशक्य होईल.

लखनऊचा संघ आता गुणतालिकेत 12 सामन्यांत 6 विजयांसह 13 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. लखनऊला आपले उर्वरित दोन सामने मुंबई आणि केकेआरकडून खेळायचे आहेत. जर त्यांनी एकही सामना जिंकला तर राजस्थानचा संघ शेवटचा सामना जिंकूनही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. म्हणजे राजस्थानच्या आशा अजूनही लखनऊवर अवलंबून आहेत.

आरसीबी, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स हे प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी संघर्ष करत आहेत. हे सर्व संघ 16 गुणांचा आकडा गाठू शकतात. मात्र आगामी सामन्यांमध्ये हे सर्वजण एकमेकांसमोर उभे ठाकतील म्हणजे एक संघ पुढे जाईल आणि एक बाहेर जाईल, अशी समीकरणे तयार होताना दिसत आहेत.

यावेळी आरसीबी, राजस्थान, केकेआर आणि पंजाबचे 12-12 गुण आहेत. त्याच वेळी केकेआर आणि राजस्थान यांनीही त्यांचे 13-13 सामने खेळले आहेत. म्हणजेच सामन्यांनुसार, आरसीबी आणि पंजाबला उर्वरित संघांपेक्षा पात्र होण्याची अधिक संधी आहे.