IPL 2023 : प्लेऑफसाठी एक-दोन नव्हे तर 3 संघांमध्ये एका स्थानासाठी लढत… बनले 6 समीकरणे, जाणून घ्या | IPL Playoffs Scenario Point Table Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2023 Playoffs Scenario

IPL 2023 Playoffs Scenario: प्लेऑफसाठी एक-दोन नव्हे तर 3 संघांमध्ये एका स्थानासाठी लढत… बनले 6 समीकरणे, जाणून घ्या

IPL 2023 Playoffs Scenario Point Table : आयपीएल 2023 च्या लीग टप्प्यात फक्त दोन सामने बाकी आहेत आणि अजूनही प्लेऑफसाठी एक जागा बाकी आहे. आयपीएलमध्ये यापेक्षा जास्त थ्रिलची अपेक्षा काय करता येईल. रविवारी प्लेऑफमधील शेवटचा संघ निश्चित होणार आहे. पण यासाठी लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्याची म्हणजेच 70व्या सामन्याची वाट पाहावी लागेल.

बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा सामना होणार आहे. शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्सने त्यांचे शेवटचे सामने जिंकून प्लेऑफचे तिकीट बुक केले.

लखनौ आणि चेन्नई या दोघांचे 17-17 गुण होते. पण चांगल्या नेट रन रेटमुळे, चेन्नई गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे आणि आता क्वालिफायर-1 मध्ये, त्याची स्पर्धा गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होईल.

आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या तीन संघांचे प्लेऑफचे दरवाजे शेवटच्या 2 सामन्यावर अडकले आहेत. अशा परिस्थितीत कोणता संघ प्लेऑफमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे, समीकरणे काय आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे.

पहिले समीकरण : मुंबई-बेंगळुरू दोन्ही जिंकले तर काय होईल?

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स या दोन्ही संघांनी त्यांचे शेवटचे साखळी सामने जिंकल्यास दोन्ही संघांचे 16-16 गुण होतील. पण या परिस्थितीत आरसीबीला फायदा होईल, कारण त्याचा निव्वळ धावगती मुंबईपेक्षा चांगला आहे आणि प्लेऑफमध्ये पात्र ठरणारा तो चौथा आणि शेवटचा संघ ठरेल. आरसीबीने गुजरात टायटन्सचा एका धावेने पराभव केला तरी. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पुढे राहण्यासाठी मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादला किमान 79 धावांनी पराभूत करावे लागेल.

दुसरे समीकरण : मुंबई किंवा रॉयल चॅलेंजर्स जिंकले तर?

आता मुंबई किंवा बेंगळुरू यापैकी एकाने जिंकले तर ते 16 गुणांसह प्लेऑफमध्ये पात्र ठरतील. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्ससाठी सर्वोत्तम समीकरण म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला.

तिसरे समीकरण : मुंबई आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू दोन्ही हरले तर?

राजस्थान रॉयल्सला या निकालाची अपेक्षा असेल, कारण असे झाले तरच राजस्थानचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग खुला होऊ शकेल. असे झाल्यास मुंबई, बेंगळुरू आणि राजस्थान या तिघांचेही समान 14-14 गुण होतील आणि मुंबई खराब धावगतीमुळे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

यानंतर नेट रनरेटबाबत आरसीबी आणि रॉयल्स यांच्यात लढत होईल. अशा स्थितीत राजस्थान संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी गुजरातच्या मदतीची गरज असेल. जर आरसीबीने शेवटच्या साखळी सामन्यात प्रथम फलंदाजी करून 180 धावा केल्या तर गुजरातला हे लक्ष्य 19.3 षटकांत किंवा त्यापूर्वी गाठावे लागेल. जर आरसीबीने प्रथम क्षेत्ररक्षण केले आणि गुजरातने 180 धावांचे लक्ष्य ठेवले, तर अशा स्थितीत गुजरातने आरसीबीला 174 किंवा त्यापेक्षा कमी धावा करू दिल्यासच राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचेल. बेंगळुरूच्या पराभवाचे अंतर यापेक्षा कमी राहिल्यास बंगळुरू चांगल्या नेट रनरेटच्या आधारे प्लेऑफमध्ये पोहोचेल.

चौथे समीकरण : मुंबई-हैदराबादमधील लढत अनिर्णित राहिली तर?

या प्रकरणात जर आरसीबीने शेवटचा सामना जिंकला तर ते पात्र ठरेल. असे झाले नाही तर मुंबई हा प्लेऑफमधील चौथा संघ ठरेल.

पाचवे समीकरण : बेंगळुरू-गुजरात सामना अनिर्णित राहिला तर?

तसे झाल्यास मुंबईने हैदराबादला हरवले तर पात्र ठरेल. अन्यथा बेंगळुरूचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करेल

सहावे समीकरण : मुंबई-बेंगळुरूचे दोन्ही सामने अनिर्णित राहिले तर?

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू चांगल्या नेट रनरेटच्या आधारे प्लेऑफमध्ये पात्र ठरेल.