
IPL Final CSK vs GT : पाऊस चेन्नईच्या पथ्यावर? षटके कमी झाली तर असे असेल चित्र
IPL Final CSK vs GT : आयपीएलच्या 16 व्या हंगामाच्या अंतिम सामना रविवारी होणार होता. मात्र पावसामुळे हा सामना आज सोमवारी खेळवण्यात येत आहे. मात्र आजही सामन्यात पावसाने व्यत्यय आल्यामुळे आयपीएलच्या 16 व्या हंगामाचा विजेता कोण हे ठरवणे खूप अवघड होणार आहे. जर पावसामुळे सामनाच झाला नाही तर नक्कीच त्याचा फायदा गुजरातला होईल. मात्र षटके कमी झाली तर मात्र चेन्नईला त्याचा फायदा होऊ शकतो.
अहदमदाबादमध्ये पाऊस जरी थांबला असला तरी मैदान ओलं असल्यामुळे सामना अजून सुरू झालेला नाही. ग्राऊंड्समन जीवचं रान करून मैदान कोरडं करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जर त्यांना यात लवकर यश आले नाही तर सामन्याची षटके कमी करण्यास सुरूवात केली जाईल. मात्र यासाठी अजून एक तासभर अवकाश आहे. क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार जर सामन्याची षटके कमी होण्यास सुरूवात झाली तर पुढीलप्रमाणे चेन्नईसमोर डीएलएस टार्गेट येऊ शकते.
DLS targets for CSK (जर सामन्याची षटके कमी झाली तर)
5 षटकात 66 धावा
10 षटकात 123 धावा
15 षटकात 171 धावा
चेन्नईने जर 5 षटके खेळली आणि पुन्हा पाऊस आला. तर चेन्नईला सामना जिंकण्यासाठी पुढीलप्रमाणे धावा करणे गरजेचे आहे.
शुन्य बाद 43 धावा
1 बाद 49 धावा
2 बाद 56 धावा
3 बाद 65 धावा
4 बाद 77 धावा
5 बाद 94 धावा
चेन्नई सुपर किंग्जसाठी 5 षटकात 66 धावा जरी चेसेबल टार्गेट वाटत असलं तरी आता सामन्याची परिस्थिती बदलली आहे. खेळपट्टी झाकली आहे. मैदान आलं आहे. त्यामुळे चेंडू थोडा अडकून येऊ शकतो. तसेच आऊटफिल्ड देखील संथ होऊ शकते. त्यामुळे चेन्नईसाठी 5 षटकात 66 धावा, किंवा शुन्य बाद 43 धावा करणे तितके सोपे नाही.