IPL 2022: अय्यर-पंत पुन्हा आमने-सामने; कोलकातासमोर दिल्लीचे आव्हान

मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स व कोलकता नाईट रायडर्स हे दोन संघ आमने-सामने
ipl today match dc vs kkr
ipl today match dc vs kkr SAKAL

IPL 2022 : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघांमध्ये रस्सीखेच लागली असतानाच आज मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स व कोलकता नाईट रायडर्स हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. या लढतीद्वारे रिषभ पंत आणि श्रेय्यर अय्यर हे पुन्हा आमने सामने येणार आहेत.

कोलकता नाईट रायडर्सने यंदाच्या मोसमात पहिल्या चारपैकी तीन लढतींमध्ये विजय मिळवत दमदार सुरुवात केली होती, पण त्यानंतर मागील चार लढतींमध्ये या संघाला हार सहन करावी लागली आहे. त्यामुळे या संघाचा पाय खोलात गेला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर याने मंगळवारी म्हटले, की आमच्या संघातील खेळाडूंना सूर गवसल्यास आम्हाला कुणीही रोखू शकणार नाही. त्याच्या या वक्तव्यावरून संघातील खेळाडूंचा आत्मविश्‍वास खालावलेला नाही हे प्रकर्षाने दिसून येत आहे, पण तरीही हा आत्मविश्‍वास मैदानावरही दिसायला हवा; अन्यथा प्ले ऑफपासून या संघाला दूर राहावे लागेल.(IPL Today Match DC vs KKR)

नितीश, व्यंकटेश, वरुणचे अपयश

कोलकाता नाईट रायडर्सला या मोसमात तीन प्रमुख खेळाडूंचे अपयश बोचणी देणारे ठरते आहे. मधल्या फळीतील फलंदाज नितीश राणा (१४३ धावा), व्यंकेटश अय्यर (१२६ धावा) व वरुण चक्रवर्ती (४ बळी) या तीन खेळाडूंना अद्याप ठसा उमटवता आलेला नाही. याचा फटका कोलकाता नाईट रायडर्सला बसत आहे. वरुणच्या संघातील समावेशाबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे त्याच्याऐवजी आगामी लढतींमध्ये अनुकूल रॉय, हर्षित राणा, अमन खान यांच्यापैकी एकाला संधी देण्यात आल्यास आश्‍चर्य वाटणार नाही.

शार्दुल, अक्षर यांच्याकडून निराशा

शार्दुल ठाकूर व अक्षर पटेल या दोन दिल्ली कॅपिटल्सच्या अष्टपैलू खेळाडूंना आतापर्यंत म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. शार्दुलने ४ व अक्षरने ३ फलंदाज बाद केले आहेत. फलंदाजीतही शार्दुलला ८०; तर अक्षरला ७९ धावाच करता आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com